एकेकाळी समृध्द आणि संपन्न असं विदर्भातील शिर्ला गाव. राष्ट्रीय रेशीम परीयोजने अंतर्गत रेशीम किडे निर्मिती प्रशिक्षण केंद्र असलेलं गाव. गावाला काही वर्षांनंतर दुष्काळाने ग्रासलं. पाण्याच्या अभावामुळे शेती आणि पिकांचं नुकसान झालं. पाण्यावर लाखो रुपये खर्च करूनही परिस्थिती बदलली नाही. रेशीम किडे निर्मिती प्रशिक्षण केंद्र देखील बंद पडले.
अशातच गेल्यावर्षी गावात शासनाची जलयुक्त शिवार योजना राबवली गेली. कामं सुरु झाली. आणि अजून एक संधी गावाला मिळाली, ती म्हणजे सत्यमेव जयते वॉटर कप २०१७. गावाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि गावात जलसंधारणाची कामं केली. बंद पडलेलं रेशीम फार्म परत सुरु झालं.
गावाचा उत्साह वाढविण्यासाठी आमिर आणि किरण यांनी गावाला भेट दिली आणि त्यांच्या बरोबर गप्पा मारल्या. काय गप्पा झाल्या त्यांच्यात? बघा ह्या व्हिडीओतून.
कालावधी - ६.23 मिनिट
स्त्रोत - पाणी फौंडेशन
अंतिम सुधारित : 10/7/2020