অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आयएसओ मानांकन प्राप्त राज्यातील पहिले सायबर पोलीस स्टेशन- बुलडाणा

आयएसओ मानांकन प्राप्त राज्यातील पहिले सायबर पोलीस स्टेशन- बुलडाणा

महाराष्ट्र शासनाने 15 ऑगस्ट 2016 रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळी सर्व जिल्ह्याच्या मुख्यालय स्तरावर सायबर पोलीस स्टेशनची स्थापना केली, त्यापैकी बुलडाणा सायबर पोलीस स्टेशन राज्यातील पहिले ISO 9001:2015 मानांकन प्राप्त सायबर पोलीस स्टेशन ठरले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना, अपर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे व पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन बुलडाणाने जिल्ह्यात सायबर संबंधी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सायबर पोलीस स्टेशन बुलडाणा यांनी सन 2017-18 मध्ये एकूण 7 गुन्ह्याचा तपास केला असून त्यापैकी 3 गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली. त्यामध्ये दोषारोपपत्र पाठविण्यात आले आहे. एटीएम व अन्य मार्गाने फसवणूक झालेल्या तक्रारदारांना एक लाखापेक्षा जास्त रक्कम त्यांना त्यांच्या खात्यामध्ये परत मिळवून देण्यात आली आहे. अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले ज्यामध्ये खामगांव येथील 5 दिवसांचे बाळ चोरी प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसात बाळाचा शेाध घेऊन त्यास दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आले. साखरखेर्डा येथे चोरीच्या 26 मोटर सायकल जप्त करण्यात आल्या असे अनेक गुन्हे उघडकीस आणून संपूर्ण जिल्ह्यात कार्यवाही करण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल अनेक गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये सायबर पोलीस स्टेशने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सायबर पोलीस स्टेशन बुलडाणाद्वारे जिल्ह्यात सायबर गुन्हे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. येथे 15 ऑगस्ट 2017 रोजी शशिकुमार मीना, पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून या जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली व त्याच दिवशी 4 विविध विषयांवर आधारीत व्हिडीओ ज्यामध्ये एटीएमद्वारे फसवणूक, सोशल मीडिया जनजागृती, महिला सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत व्हिडीओ प्रसारीत करण्यात आले. जिल्ह्यातील शाळा/ महाविद्यालयांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रसार माध्यमांचा प्रतिनिधींचे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले. तसेच प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी सायबर चित्ररथ, पोलीस वर्धापन दिनानिमित्त सायबर गुन्हे जनजागृतीß क्रिकेट चषक आदीü कार्यक्रम राबविण्यात आले.

वरील सर्व उपक्रम पाहता ISO चमूने 7 मार्च 2018 रोजी सायबर पोलीस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आदर्श अभिलेख व्यवस्थापन, आधुनिक साधनसामुग्री, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, स्वच्छ परिसर, प्रशिक्षीत मनुष्यबळ व इतर बाबींची पाहणी करुन ISO मानांकनासाठी पोलीस स्टेशन पात्र असल्याचे जाहीर केले आणि 13 मार्च 2018 रोजी ISO प्रमाणपत्र प्रदान केले.

सदर उपक्रमाकरीता सायबर पोलीस स्टेशन प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस उप निरीक्षक मिलींदकुमार दवणे व स्टाफ पो.हे.कॉ. ज्ञानेश नागरे, ना.पो.शि. राजु आडवे, नंदकिशोर आंधळे, सुनिल वाघमारे, निलेश वाघमारे, पवन मखमले, सजीत सोनार व पो.कॉ. संजय भुजबळ, अमोल तरमळे, योगेश सरोदे, पंकज गीते यांनी परिश्रम घेतले.

- निलेश तायडे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/18/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate