অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जागतिक निसर्ग संवर्धन दिन- २८ जुलै

जागतिक निसर्ग संवर्धन दिन- २८ जुलै

निसर्गातील अनेक घटकांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करतो. परंतु, गरजेपलीकडे जाऊन असे घटक ओरबाडले जाऊ लागल्याने संपूर्ण सृष्टीचक्रातच अडथळे येऊ लागले आहेत. योग्य, शाश्वत आणि नियंत्रित वापराबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यासाठी हा ‘नेचर कॉन्झर्वेशन डे’ जगभर पाळला जातो.

मूळ संकल्पना व सुरुवात

विकास (डेव्हलपमेंट) म्हणजे आपले उद्दिष्ट साधण्याच्या आड येणारे सर्व काही नष्ट करायचे अशी चुकीची संकल्पना. आधुनिक व सुखासीन जीवनशैलीमधून, रुजू लागल्याने पृथ्वीवरील नैसर्गिक समतोल बिघडला. त्याचे परिणाम लवकरच दिसू लागल्याने निसर्ग संरक्षणाची आणि संवर्धनाची जाणीव सर्वांच्या मनात ठसविणे गरजेचे बनले. वस्तू आणि संसाधनांचा पुनर्वापर केल्यानेही खूप चांगला फरक पडतो असेही दिसून आले आहे.

अधिक माहिती

सध्या आपण वापरत असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती तयार होण्यास हजारो वर्ष लागतात. परंतु आपण ती संपविण्याचाच निश्चय केल्यासारखी स्थिती आहे. यामुळे वने, वन्यजीव, वनांतून मिळणारे पदार्थ, खनिजे आणि खनिज इंधने... सर्वच मौल्यवान स्रोतांवर असह्य ताण आला आहे व त्याचे परिणाम थोड्याच वर्षात वापरकर्त्याला म्हणजे आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. जीवनशैलवर नियंत्रण ठेवणे आणि वस्तूंचा पुनर्वापर (३ आर म्हणजे रिड्यूस, रीयुज, रिसायकल) हा उपाय सर्व पातळ्यांवर केल्यासच आशेचा किरण आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली तरच हा दिवस सार्थकी ठरू शकतो.

 

माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate