‘अतिपरिचयात अवज्ञा’ म्हणजे नेहमी दिसणा-या गोष्टींचे खरे महत्त्व जाणवत नाही.असा त्याचा साधारण अर्थ आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या चिमण्यांची संख्या कमी होणे हे त्याचे एक उदाहरण ! वाढत्या प्रदुषणामुळेच चिमण्यांची संख्या कमी झाली, हे खरेतर विनाशाचेच प्रतीक आहे.
जगभरातील लोककथा आणि ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिवचिव चिमणी गेली कुठे? असा प्रश्न जगभरातील पर्यावरणप्रेमींना पडू लागला. कारखान्यातल्या चिमणीचे भकभक धूर ओकणे प्रमाणाबाहेर वाढले आणि अंगणातली चिमणी दिशेनाशी होऊ लागली. पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, २०१० सालापासून हा ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ साजरा केला जाऊ लागला आहे.
भारतातील नाशिकमधील ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’ आणि फ्रान्समधील ‘इकोसिस अॅक्शन फाउंडेशन’ या संस्थांनी- इतरही असंख्य स्वयंसेवी संस्थांबरोबरच – या बाबीचा विस्तृत अभ्यास केला. चिमण्यांची घटती संख्या हे वातावरणातील वाढत्या प्रदुषणाचे लक्षण आहे काय, हे शोधण्यासाठी जगभर चळवळ उभारली. २०१५ सालाच्या दिवसाची मुख्य संकल्पना होती ‘आय लव्ह स्पॅरो’ दिल्ली महापालिकेने चिमणी हा तेथील राज्य- पक्षी जाहीर केला आहे.
माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६
अंतिम सुधारित : 9/28/2019
खारफुटी वनांचे संरक्षण – संवर्धन होण्यासाठी व त्या...
संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (...
अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर देण...
जंगलतोडीला अटकाव करण्यासाठी अक्षरशः स्वत:चे प्राण ...