निलगिरी वृक्ष सु. ९० मी. उंचीपर्यंत वाढतो. खोड सरळ व मऊ असून त्यावरील त्वक्षा तुकड्यातुकड्यांत गळून पडते. लहान रोपटे असताना पाने समोरासमोर, तर वृक्षात पाने एकाआड एक, भाल्यासारखी, २०-२५ सेंमी. लांब, रुंद, थोडीशी जाडसर आणि वळणदार असतात. फुले मोठी, घंटेसारखी, पांढरी, क्वचित पिवळट वा लालसर, १-३ एकत्र आणि कक्षस्थ येतात. पुमंगात अनेक पुंकेसर असतात. फळ कठीण व लहान करंड्याप्रमाणे असून ते करंड्याप्रमाणे उघडते. बिया लहान व अनेक असतात.
निलगिरीची लाकडासाठी तसेच सावलीसाठी उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत लागवड केली जाते. त्यापासून मिळणारे लाकू ड जहाज बांधणीसाठी,सिलीपाट (रेल्वे स्लीपर्स), वीज व तारेचे खांब म्हणून ाापरतात. पाने ऑॅस्ट्रेलियातील कोआला या सस्तन प्राण्याचे मुख्य खाद्य आहे. पानांपासून तेल काढतात. या तेलात यूकॅलिप्टॉल हे संयुग असते. तेल झोंबणारे (जहाल), कडू, पाचक, वायुनाशी, कफ व वात स्थितीत उपयुक्त असते. ते जंतुरोधक व दुर्गंधीरोधी असून कफ पातळ करण्यासाठी वापरतात. ते श्वासनलिकादाह, न्यूमोनिया व इतर श्वसन संस्थेच्या विकारांवर उपयुक्त असते. मात्र, तेलाचा वापर आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्यास उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात.
कुलकर्णी, किशोर
स्त्रोत: कुमार विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
कुंदा नदी : निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्याती...
वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड...
निलगिरीचे वनस्पतीपासून सुगंधी द्रव्योद्योग तेले, औ...
कुंदा नदी : निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्याती...