অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिरायत, लहान

चिरायत, लहान

चिरायत, लहान

(लुंतक; हिं. खेत चिरायत, बारीक चिरायत, गु. जंगली करायतु; लॅ. सेंटॉरियम रॉक्सबर्घाय; कुल-जेन्शिएनेसी). सु. पाच ते वीस सेंमी. उंच, सरळ वाढणाऱ्या या ⇨ओषधीचा प्रसार भारतात ६२० मी. उंचीपर्यंत सर्वत्र असून विशेषतः ती लागवडीखालील जमिनीत सामान्यपणे आढळते. हिची सर्वसाधारण लक्षणे जेन्शिएनेसी अथवा किराईत कुलातील जातीप्रमाणे [किराईत गण; → जेन्शिएनेलीझ] आहेत. मूलज (मुळांपासून निघाल्यासारखी वाटणारी) पाने गुच्छाकृती दीर्घस्थायी (दीर्घकाल राहणारी), व्यस्त अंडाकृती, लहान व संमुख (समोरासमोर) असून स्कंधोद्‌भव (हवेत वाढणाऱ्या खोडापासून निघालेली पण जमिनीलगत न आलेली) पाने त्यांपेक्षा लहान, लांबट व रेखाकृती असतात. लालसर फुले द्विपद वल्लरीत [→ पुप्षबंध] फेब्रुवारी-एप्रिलमध्ये येतात. पुष्पमुकुट नलिकाकृती; पाकळ्या पाच व लालसर पसरट आणि तारकांसारख्या असतात [→ फूल]. बोंड लहान, लांब, अनेकबीजी असून फुटताना त्याची दोन शकले होतात. या झाडाचे सर्व भाग फार कडू व दीपक (भूक वाढविणारे) असून विशेषतः बंगालमध्ये तापावर खऱ्या किराइताऐवजी वापरतात [→ किराईत] .

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत:मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate