অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुलाई

कुलाई

कुलाई

(कुली; गु. करलिनी भाजी; लॅ. क्लोरोफायटम ट्युबरोजम; कुल-लिलिएसी). ही एक वर्षायू (एक वर्ष जगणारी आकर्षक लहान ⇨ ओषधी भारतात रानावनात (कुरणात) जंगली अवस्थेत आढळते; शिवाय ब्रह्मदेश, इथिओपिया इ. देशांतही आढळते. हिची मुळे ग्रंथिल असतात.

पाने साधी, मूलज (मुळापासून निघालीत अशी वाटणारी), अवृंत (बिनदेठाची), कोयत्यासारखी, लांबट व तरंगित कडांची असून त्यांच्या झुबक्यातून जुलै-ऑगस्टमध्ये पांढऱ्‍या फुलांची मंजरी येते. इतर लक्षणे ⇨लिलिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे.

हिच्या लंबगोल बोंडात १०–१२ काळ्या, गोल बिया असतात. बागेची शोभा वाढविण्यास उपयुक्त. पानांची भाजी (पंचमेळी भाजीपैकी एक) श्रावणात शनिवारी हिंदू धर्मीय खातात.

 

 

लेखक: जगताप, अहिल्या पां.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate