অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आर्गल

आर्गल

मेंढीची सर्वांत मोठी व रानटी जात. सैबेरिया, मंगोलिया व तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात ही राहते. हिचे शास्त्रीय नाव ओव्हिस अ‍ॅमॉन असे आहे. आर्गलीची खांद्यापाशी उंची १·२० मी. आणि वजन १६० किग्रॅ. असते. मेंढ्याची शिंगे १·५ मी. लांब व वजनदार असून बाहेरच्या बाजूला वाकलेली असतात. शरीराचा रंग फिक्कट तपकिरी असतो. यांचे मोठे कळप असतात. आर्गली गवत खातो. यांचे डोळे आणि घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते. प्रजोत्पादनाचा काळ हिवाळा असून पिल्ले जूनच्या सुमारास जन्मतात.

लेखक : मीनाक्षी जोशी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate