जैव पदार्थापासून विद्दुत निर्मिती या प्रकल्पात ११ के.व्ही.ऐ. क्षमतेचे डाऊनड्राफ्ट पद्धतीचे गेंसीफायर वापरण्यात आलेले आहे. तसेच वेडीबाभूळ हि झुडूपसदृश्य वनस्पती बहुतांश ठिकाणी वाढलेली दिसून येते. वेड्या बाभूळीच्या सुबाभूळीच्या लहान फांद्यांचा वापर वाळवून गेंसीफायरमध्ये उर्जानिर्मितीसाठी करता येतो.
गेंसीफिसेशन या प्रक्रियेत घन इंधनाचे रुपांतर वायूरूप इंधनात केले जाते. सदर गेंसीफायरमध्ये सुरुवातीला १५० किलो इंधन भरावे लागते व ते ठराविक आकारात असणे आवश्यक असते. यामध्ये २५*२५ मी.मी. आकाराचे वेडीबाभूळीच्या लाकडाचे वाळलेले तुकडे वापरण्यात येतात. गेंसीफायर सुरु केल्यानंतर एका तासात अंदाजे १५ ते १७ किलो घन इंधनापासून प्रोडुसर गस द्वारे १० किलोवट ऊर्जानिर्मिती होते. विद्दुत भारनियमाच्या काळात अशा प्रकारच्या संयात्राद्वारे आपण स्वतःच स्वतःपुरती किंवा आपल्या गावाची विजेची गरज भागवू शकतो. सदर संयात्राद्वारे तयार होणारी वीज पाणी उपसण्याचा पंप, पिठाची गिरणी व प्रकाश व्यवस्था इत्यादी कामाकरिता वापरू शकतो. एकूण किंमत : ८.४८ लक्ष रुपये आहे.
स्त्रोत : अग्रो विदर्भ
अंतिम सुधारित : 1/30/2020
नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जा मंत्रालय मोठ्या शहरां...
पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, लघुजल विद्युत सहवीज निर्मिती...
ऊर्जे विषयीच्या बातम्या
मानवाच्या विकास उन्नतीमध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत...