भारतीय उर्जा क्षेत्रात १९६० पासून फार वेगाने घडामोडी होत आहे .अनेक खाजगी वीज प्रकल्प उभारले जात आहेत.ओरिसा राज्यातील उर्जा क्षेत्रातील सुधारणा किवा एनरॉन प्रकल्प यांनी अनेक वादग्रस्त मुदे उपस्तीत केले आहेत .या पुनरचनेची पार्श्वभूमीवर आलेल्या वीज कायदा २००३ मुले उर्जा क्षेत्रातील धोरणांविषयी बरीच उलथापालथ झाली आहे .अनेक नविन कंपन्या या क्षेत्रात येताना दिसत आहेत .खर्चावर आधारित वीज दर ठरवण्याची सुरुवात झालेली दिसत आहेत .खर्चावर आधारित वीज दर ठरवण्याची सुरुवात झालेली दिसत आहेत .वीज पुरवठादार ठरण्याची मुभा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे .या सगळ्याचा रोख स्पर्धा, विकेंद्रीकरण व राज्यांच्या भविष्यातील मक्तेदारीला आळा घालण्याकडे आहे . या वेगाने होणारया घडामोडींना सामोरे जाताना दक्ष नागरिकांना अनेक नवीन प्रश्न भेडसावत आहेत त्यांना ठामपणे सामोरे जाण्यासाठी उर्जा क्षेत्रातील तांत्रिक आणि आर्थिक गोष्टींची ओळख असणे गरजेचे आहे . सकारात्मक ,परिणामकारक हस्तक्षेपासाठी त्याला या क्षेत्राचे व्यवस्थापन तसेच तांत्रिक व आर्थिक प्रश्नांचे ऐकमेकांशी असलेले अंतर्गत संबंध याचीही माहिती असणे अत्यावश्यक आहे .सजग नागरिकांच्या त्यांच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी उर्जा क्षेत्राचा सर्वागिन आढावा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
प्रकाशक : प्रयास, प्रयास उर्जा गट, पुणे
स्त्रोत : prayaspune.org (पूर्ण पुस्तक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)
अंतिम सुधारित : 6/30/2020
जगभरात तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतो आहे. पूर्व...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्ह...
महाऊर्जातर्फे ऊर्जा संवर्धनासाठी विविध योजना राबवि...
देशातील विविध विकास कामांसाठी लागणारी उर्जा, वाढत्...