मडगाव
मडगाव : गोव्यातील एक महत्त्वाचे व्यापारी व पर्यटन केंद्र, लोकसंख्या ५३,०४७; उपनगरांसह ६४,८२० (१९८१). सासष्टी (सालसेट, साष्टी) तालुक्यातील हे शहर पणजीच्या आग्नेोयीस सु. ३० किमी. वर असून ते वास्को द गामा - कॅसलरॉक या द. मध्य रेल्वेच्या मध्यमापी लोहमार्गावरील प्रमुख स्थानक आहे. हे रस्त्याने तसेच शहराजवळील (सु.२ किमी.) साळ नदीद्वारे जलमार्गानेही इतर शहरांशी जोडले आहे.