वॉशिंग्टन, जॉर्ज
वॉशिंग्टन, जॉर्ज : (२२ फेब्रुवारी १७३२- १४ डिसेंबर १७९९). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पहिला राष्ट्राध्यक्ष व स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख सेनापती. त्याचा जन्म सुसंस्कृत-सधन कुटुंबात ऑगस्टीन व मेरी बॉल या दांपत्याच्या पोटी वेस्टमोरलंड परगण्यातील (व्हर्जिनिया) पोप्सक्रीक वा ब्रिजेसक्रीक (वेकफील्ड) बागवाडीत झाला.