उद्योगप्रियतेने दिली साथ : बेरोजगारीवर केली मात
स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील युवक युवतीना विविध प्रकारच्या स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देते. याच प्रशिक्षणाचा फायदा घेऊन डोंगरी बुजुर्ग या गावातील विलास गेडाम या तरुणाने गावातच दुचाकी दुरुस्तीचे दूकान थाटून उत्तम कमाई सुरु केली आहे.