सूर घराणे
सूर घराणे : मुसलमानी अंमलातील मोगलकाळात उदयाला आलेला एक अफगाण वंश. या वंशातील सुलतानांनी अठरा वर्षे (इ. स. १५३८– ५६) दिल्लीच्या तख्तावर अधिसत्ता गाजविली. या घराण्यात शेरशाह (कार. १५३८– ४५), इस्लामशाह (कार. १५४५— ५४), फीरुझशाह (कार. १५५४) आणि मुहम्मद आदिलशाह (कार. १५५४– ५६) हे सुलतान झाले.