टाँगा
टाँगा : फ्रेंडली बेटे. द. पॅसिफिकमधील एक संसदीय राजसत्तेचा स्वतंत्र द्वीपसमूह. क्षेत्रफळ ६९७ चौ. किमी.; लोकसंख्या ८७,४०६ (१९७०). हा १५० हून अधिक बेटांचा समूह फिजीच्या पूर्वेस व सामोआच्या दक्षिणेस सु. १५° द. ते २३° ३०' द. व १७३° प. ते १७७° प. यांदरम्यान असून त्यात दक्षिणेकडील टाँगाटापू, मध्यातील हापाई आणि उत्तरेकडील व्हाव्हाऊ हे तीन प्रमुख गट आहेत.