लोकसंस्कृतीने भारलेलं शिंदे-हट्टी
माणसाचं सणांशी जुळलेलं नातं निसर्गाशी निर्माण झालेल्या ऋणानुबंधातून जन्मलं. याची प्रचिती आजही अंगणात नांदताना दिसणाऱ्या पुरातन संस्कृती अन् प्रथा-परंपरातून दिसते. माणसाचे मुखवटे बदलले तसे काळानुरूप रूढी परंपरामध्येही बदल झाले.