द्यूप्लेक्स, जोझेफ फ्रान्स्वा
द्यूप्लेक्स, जोझेफ फ्रान्स्वा : (१ जानेवारी १६९७–१० नोव्हेंबर १७६३). भारतातील फ्रेंच वसाहतींचा एक महत्त्वाकांक्षी राज्यपाल. त्याचा जन्म लेंड्रसी येथे झाला. त्याचे वडील फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीत डायरेक्टर जनरल या हुद्यावर होते.