घुगरी
घुगरी : (चिराती; हिं. अगुमकी, बिलारी; लॅ. मेलोथ्रिया मदर-सपाटना; कुल-कुकर्बिटेसी). ही जमिनीवर पसरणारी किंवा कुंपणावर चढून वाढणारी वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ओषधी श्रीलंका, मलाया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व भारत इ. देशांत आढळते. भारतात १,८०० मी. उंचीपर्यंतच सर्वत्र आढळते. खोड कोनयुक्त व केसाळ; पाने अंडाकृती किंवा अर्धत्रिकोणी, अखंड किंवा ३-५ खंडित व सूक्ष्म दातेरी असतात.