कुंभगर्त
कुंभगर्त : नदीच्या पात्रातील खडकात तयार झालेला रांजणाच्या आकाराचा खळगा. नदीप्रवाहाच्या, विशेषत: वरच्या टप्प्यात, पाण्याबरोबर वेगाने वाहत आलेले दगडगोटे पात्रातील खडकावर घासू लागतात. पाण्याच्या लहानमोठ्या भोवर्यांबरोबर या दगडगोट्यांनाही वाटोळी गती मिळते. त्यांच्या आणि पाण्याच्या घर्षणामुळे खडकावर वाटोळा खळगा तयार होऊ लागतो.