इजीअन समुद्र
इजीअन समुद्र : भूमध्यसमुद्राचा फाटा. लांबी सु. ६५० किमी., रुंदी ३२५ किमी. व क्षेत्रफळ १,७९,००० चौ. किमी. याच्या पश्चिमेस व उत्तरेस ग्रीस, पूर्वेस तुर्कस्तान व दक्षिणेस क्रीट बेट आहे. दार्दानेल्सच्या सामुद्रधुनीने हा मार्मारा समुद्रास जोडलेला आहे.