অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परसबाग व शोषखड्ड्याचे नियोजन

    परसबाग व शोषखड्ड्याचे नियोजन

  • परसातील रिकाम्या जागेचा भाजीपाल्यासाठी कायम उपयोग करावा.
  • माती नसेल तर शेतातील थोडी माती आणून परसबागेसाठी वापरता येते.
  • जनावरांपासून बागेचे रक्षण करण्यासाठी काट्यांचे, तारेचे कुंपण घालावे.
  • सांडपाणी योग्यरीतीने  परसबागेत जाईल अशी व्यवस्था करावी.
  • पावसाळ्यात परसबागेत पाणी साठू नये म्हणून उताराच्या दिशेने नळी काढावी.
  • उन्हाळ्यात परसबागेला मिळणारे पाणी टिकून रहावे म्हणून शक्य असले तर गवताचे आच्छादन करावे.
  • रोपं तयार करण्यासाठी शक्य असल्यास एखादा कोपरा राखून ठेवावा.
  • आपला रोजचा निघणारा कचराही एखादया कोप-यात खड्डा करून जमा करावा. यापासून तयार होणारे खत बागेसाठी वापरता येईल.
  • भाजीपाल्यावर एखादा रोग पडला तर लगेच औषध फवारावे व वेळेवर खुरपणी करावी.
  • परसबागेत झाडवर्गीय, वेलवर्गीय, मूळवर्गीय इ. सर्व प्रकारची भाजी लावता येते.
  • परसबागेत शक्य असल्यास पोयटा माती टाकावी. माती वर्षातून चार वेळा तरी वर खाली केली गेली पाहिजे.
  • सांडपाणी सुरुवातीला ज्या भागात येते, तिथे केळी, शेवगा, कढीपत्ता अळूसारख्या भाज्या लावाव्यात. कारण यांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. नंतर झाडवर्गीय भाजी लावावी. उदा. वांगी, गवार, भेंडी, मिरची इ. व त्यानंतर भाजीवर्गीय उदा. मेथी, चुका, पालक, कोथिंबीर इ. व मूळवर्गीय उदा. कांदा, मुळा, रताळी लावावीत. वेलवर्गीय भाजी कारले, दोडका, वाल इ. कुंपणावर, छतावर किंवा मांडवावर सोडाव्यात.

काळजी काय घ्यावी ?

१)साबणाचे पाणी परसबागेत जाऊ देऊ नये.

२)युरिया सारखी रासायनिक खते वापरू नये, नाहीतर रोपे जळून जातात.

३)शेणखत, कंपोस्टखत,गांडूळखत किंवा वापरलेली चहाची पावडर गोळा करून खत म्हणून वापरावे.

४)कोंबड्या,शेळ्या, कुत्रे यापासून संरक्षण होण्याकरीता परसबागेला कुंपण घालावे.

  • घराभोवती रस्त्यावर तुंबलेले पाणी किंवा डबकी यात खराब ऑईल साबणाचा फेस किंवा रॉकेल ओतावे जेणेकरून त्यात डास होणार नाहीत. लहान खडगी, खड्डे असतील तर ती बुजवून टाकावी.

 

स्त्रोत : परिसर स्वच्छता व डासांमुळे होणारे आजार, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 5/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate