অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घनकच-याचे प्रकार


अ) कुजणारे पदार्थ

पालापाचोळा, भाजीपाल्याचा उरलेला अंश, स्वयंपाकातील टाकलेले पदार्थ, जनावरांची विष्ठा, मेलेले प्राणी, लाकूड, इ.

ब) न कुजणारे पदार्थ

यात दोन उपगट केले जातात. ब-1 : पुनर्वापरासाठी/प्रक्रियाशील - यात प्लास्टिक, कागद, काच, कपडा, लोखंड, रबर इ. वस्तू येतात. म्हणजेच हा माल 'भंगार' म्हणून विकता येईल. ब-2 : अप्रक्रियाशील : थर्मोकोल, टेट्रापॅक, पाण्याच्या बाटल्या इ. हा भाग कोणी विकत घेत नाही.

घनकच-याचा उगम

1. घरातून निघणारा घनकचरा - भाजीपाला, फळे इ. चे तुकडे, कपडे, प्लास्टिक,घरगुती वापरातील इतर वस्तू.

2. शेतातून निघणारा घनकचरा - पिकांचे अवशेष, सडलेली फळे, पाला, झाडांची खोडं,इ.

3. इतर - कंपन्यामधील टाकाऊ वस्तू, मेलेले प्राणी, काचा, टाकाऊ फर्निचर,कारखान्यातील राख, इ. घनकचरा व्यवस्थापनामधील महत्त्वाचा भाग म्हणजे घनकच-याचं वर्गीकरण. घनकच-याचे साधारण खालील प्रकारे वर्गीकरण करता येऊ शकते.
1. ओला कचरा/कुजणारा कचरा.
2. सुका कचरा / न कुजणारा कचरा.
3. पुन्हा वापरता येण्यासारखा कचरा

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 1/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate