ग्रामीण भागात विशेषतः डोंगराळ भागात घरामध्येच गुरे बांधण्याची पध्दत सर्रास दिसून येते. गुरांची काळजी व खर्चाची काटकसर यामुळे गोठे घरात ठेवण्याची पध्दत असावी. गुरांमुळे पिसवा,गोचिडी यांचा त्रास तर होतोच; पण काही आजारही गुरांमुळे घरात शिरतात. मुख्यत: श्वसनसंस्थेचे जंतुदोष आणि त्त्वचारोग यांचा त्रास गोठयांमुळे घरात येतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी घरापासून जनावरांचा गोठा निदान 10-20 फूट लांब ठेवला पाहिजे. वा-याची दिशा पाहून गोठा ठेवल्यास जास्त चांगले. ज्यांना वेगळा गोठा ठेवणे शक्य नाही त्यांनी गोठा आणि घर यामध्ये सलग भिंत ठेवावी. यात मध्ये दार ठेवू नये. जनावरांचे मलमूत्र ही एक मोठी समस्या असते. हाताने शेण गोळा करणे आणि त्याचा वापर करणे हे व्यक्तिगत आरोग्याला अपायकारक असते. परंतु भारतीय समाजात परंपरेने शेणाच्या वापराला महत्त्व आहे.
शेणाचा खतासाठी किंवा गोबरगॅससाठी परस्पर (न हाताळता) वापर करता आला तर जास्त चांगले. गोव-यांसाठी वापर करताना काही यंत्रांचा वापर केला किंवा रबरी हातमोजे वापरले तर जास्त चांगले.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरो...
जनावरांच्या व्यवस्थापनात गाभण जनावरांची योग्य निगा...
या विभागात गायी, म्हशी आणि बैल यांच्या विविध जाती,...
कडबाकुट्टी मशिन वापरण्यास सुरू करण्याअगोदर त्याचे ...