अस्थिभंगाची आणि जखमांची चर्चा पुस्तकात इतर ठिकाणी केली आहे. रस्त्यावरच्य अपघातांचे प्रमाण खूप वाढते आहे आणि त्यात अनेक प्रकारच्या जखमा होतात, यातल्या ब-याच घातक ठरतात. आपल्या सोयीसाठी आपण या जखमांचे वर्गीकरण करू या.
हात-पायाशी संबंधित अस्थिभंग, डोके फुटणे व त्यातील मेंदू, डोळा, कान यांच्या जखमा, जबडयाच्या व चेह-याच्या जखमा
छातीच्या जखमा, आतली फुप्फुसे हृदय यांना इजा, उदरपोकळीतील जठर, लहान आतडे, पांथरी, इ. इंद्रियांना इजा पोहोचणे
योग्य तो प्रथमोपचार देऊन जखमीस ताबडतोब रुग्णालयात पोहोचवावे. छातीच्या,पोटाच्या व डोक्याच्या जखमा फसव्या असतात, कारण आतील अवयवांना इजा झाली आहे की नाही हे कळणे सोपे नसते. वेळीच या गोष्टी कळल्या नाहीत आणि उपचारांना उशीर झाला तर मृत्यूही येऊ शकतो.
अपघातांच्या बाबतीत खालीलपैकी काहीही खाणाखुणा दिसल्यास विशेष धोका असतो. कान, नाक, तोंड यांपैकी कोठूनही रक्तस्राव होणे (कवटी फुटलेली असण्याची शक्यता) कोठेही अस्थिभंग आढळणे. यासाठी त्या व्यक्तीच्या सर्व शरीराची तपासणी करावी लागेल. डोके, हात, पाय, फासळया, पाठीचा कणा, कंबर यांपैकी कोठेही अस्थिभंग असू शकेल. अस्थिभंगाच्या ठिकाणी बहुधा वेदना आढळते (वृध्द व्यक्ती असेल तर अस्थिभंग वेदनारहितही असू शकतो). अस्थिभंग उघड किंवा आतल्या आत असू शकतो.
अतीव वेदना, विशेषतः पोट व छाती यांतील वेदना (आतील अवयवांना मार लागला असेल.).
दातांची रेषा वाकडीतिकडी होणे-जबडयाच्या अस्थिभंगाची शक्यता. इतर कोठलीही गंभीर इजा आढळल्यास.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
रस्त्यावरच्या अपघातात, मारामारीत डोक्याला जखम होऊन...
कामावर असताना झालेल्या अपघातामुळे वा आजारपणामुळे क...
किसान क्रेडिट कार्डधारकांना ‘वैयक्तिक अपघात विमा प...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मानसिक आघ...