निसर्गातील घटकांद्वारे आजार बरा करण्याच्या पद्धतीला निसर्गोपचार किंवा निसर्गोपचार पद्धती म्हणतात. निसर्गाशी सुसंवादी व निसर्गानुकू ल, औषधविरहित उपचार पद्धती अशीही निसर्गोपचाराची व्याख्या करतात. निसर्गोपचार पद्धती ही एक पर्यायी उपचार पद्धती आहे. प्रत्येक व्यक्तीला झालेल्या किंवा होणाऱ्या आजारावरील उपचार शरीरांतर्गत असून, त्या व्यक्तीच्या शरीरात निसर्गत: आजार वा रोग बरा करण्याची क्षमता तसेच रोगप्रतिकारकशक्ती असते. त्यामुळेच झालेला आजार वा रोग निसर्गत: बरा करणे आणि आरोग्य कायम राखणे त्या व्यक्तीला शक्य असते, असे या उपचार पद्धतीमागील तत्त्व आहे.
निसर्गोपचार ही एक पारंपरिक उपचार पद्धती असून ती शरीराला कमीत कमी त्रास देऊन अवलंबिली जाते. या पद्धतीत कमीत कमी शल्यक्रिया आणि औषधांचा उपयोग केला जातो. ताण नियंत्रण, आरोग्यदायी आहाराचे योग्य नियमन, मानसिक संतुलन आणि पंचमहाभूतांचा ‘योग्य’ वापर यांचा अवलंब करतात. यामुळे रोग होणे मुळातच टाळता येईल आणि रोग झालाच तर अंतर्गत ‘चैतन्य’ तो पूर्ण बरा करेल, अशी या उपचार पद्धतीची धारणा असते. आजार पूर्णपणे बरा नाही झाला तर माती, पाणी, सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यांच्या मदतीने उपचार करून रोगाची तीव्रता कमी करता येते.
निसर्गोपचाराचे उपाय करनारयांनी ही तत्त्वे पाळावयाची असतात.
लेखक : शर्वरी कोेल्हटकर
स्त्रोत : कुमार विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/9/2020
आजारपणामध्ये माणसांची प्रतिकारशक्ती कमजोर होत असते...
गावातील आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती, या समितीत स...
कृषिक्षेत्रातील उत्पादनादी नानाविध प्रक्रिया व क्र...
इंधन ही एक ग्रामीण भागाची मुख्य गरज असून, इंधनामध्...