दुस-या वर्षभरात बाळाचे वजन सुमारे 2.5 किलोने वाढते, उंची 10 ते 12 से.मी. वाढते.
एक वर्षाअखेर मुलाच्या मेंदूची वाढ मोठया माणसाच्या मानाने दोन तृतियांश (म्हणजे66टक्के) झालेली असते. (डोक्याचा घेर 47से.मी.) बाळाच्या डोक्याची वाढ दोन वर्षे पूर्ण होताच मोठया माणसाच्या चार पंचमांश (म्हणजे 80%) झालेली असते. (डोक्याचा घेर 49से.मी.) दुस-या वर्षाअखेरपर्यंत एकूण 14 ते 16 दात येतात.
12-13 व्या महिन्यात आधार धरून चालणारे मूल 15व्या महिन्यापर्यंत स्वतंत्रपणे चालते. 18व्या महिन्यापर्यंत मूल (दीड वर्ष) अडखळत पळू शकते.
दीड वर्षाच्या वयात एक हात धरून जिना चढणे बाळाला जमते. पण एक हात धरून उतरता यायला 20-21 महिने (पावणे दोन वर्षे) लागतात.
दुस-या वर्षामध्ये बाळाला आपल्या भोवतीची प्रत्येक गोष्ट कुतूहलाची वाटते व हाताळावीशी वाटते. या वयातील मुलांपासून धार असलेल्या किंवा इजा करू शकतील अशा गोष्टी, तसेच औषधे, खते, विषारी औषधे, इत्यादी दूर ठेवणे महत्त्वाचे असते.
दीड ते दोन वर्षे हळूहळू एकावर एक वस्तू ठेवून छोटा मनोरा करणे बाळाला जमू लागते. बोलण्याची सुरुवात करण्याच्या वयाबाबतीत प्रत्येक मुलात फरक पडतो. काही मुले लवकर शब्द उच्चारू लागतात तर काही उशिरा. पण दोन ते अडीच वर्षापर्यंत बहुतेक सर्व मुले छोटी वाक्ये बोलू शकतात.
दीड ते दोन वर्षानंतर शू (लघवी) किंवा शी लागल्याची सूचना मूल देऊ शकते आणि या वयानंतर संडास किंवा मोरी वापरण्याबद्दल मुलांना शिकवता येते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 6/5/2020
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आदिवासिंच...
आयसीडीएस कार्यक्रम केंद्गशासनाच्या महिला व बाल विक...
गाळपाच्या हंगामादरम्यान पुरेसा ऊस उपलब्ध असण्याची ...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...