অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अपु-या दिवसांचे मूल- जन्मत: कमी - वजनाचे मूल

आईच्या मागील पाळीपासून ते जन्मापर्यंत 37 आठवडे होऊन गेले असतील तरच जन्मलेल्या मुलाला 'पूर्ण दिवसांचे' म्हणता येईल. 37 आठवडयांच्या आतील मूल अपु-या दिवसांचे समजले जाते. बाळाचे जन्मवजन निदान 2.5 म्हणजे अडीच किलो तरी असायला पाहिजे. यापेक्षा कमी वजनाचे बाळ कमकुवत असते. आता जन्मवजन निदान 3 किलो असावे असे म्हणतात.

अपूर्ण दिवसांचे बाळंतपण होण्याची महत्त्वाची कारणे

  • कमी वयात गर्भ राहणे.
  • आधी गर्भपात झालेले असणे
  • वार आधीच सुटू लागणे.
  • पोटावर जोरात मार लागणे.
  • जुळी मुले.
  • गर्भाशयाच्या पिशवीत बाळाभोवती जास्त पाणी असणे.
  • गर्भाररोग, (गर्भारसूज, अतिरक्तदाब) व झटके
  • आईला तंबाखू/मिश्री धूम्रपानाची सवय असणे हे बाळाचे वजन कमी असण्याचे एक प्रमुख कारण आहे.

कमी जन्मवजनाची महत्त्वाची कारणे

  • आई कुपोषित व अशक्त असणे. रक्तपांढरी
  • आईला गर्भारपणात काही आजार.उदा. हिवताप-मलेरिया
  • जुळी मुले
  • लवकर लवकर मुले होणे.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate