पुरुषाकडून आणि स्त्रीकडून प्रत्येकी एक सूक्ष्म बीज (पेशी) एकत्र येऊन गर्भधारणा होते. पुरुषाकडून येणा-या पेशीला शुक्रबीज म्हणतात आणि स्त्रीकडून येणा-या पेशीला स्त्रीबीज. स्त्री-पुरुषसंबंधाच्या वेळेस इतर परिस्थिती अनुकूल असेल तेव्हा या दोन पेशी एकत्र येऊन गर्भधारणा होते.
ही गर्भधारणा स्त्रीच्या ओटीपोटातल्या गर्भाशयात होऊन या दोन पेशी प्रथम एकजीव होतात. नंतर त्यापासून सतत विभाजनाने अनेक पेशींची निर्मिती होते. हळूहळू पेशींची संख्या वाढेल तशी त्यांची तीन पदरांमध्ये रचना होते. त्या प्रत्येक पदराची वेगळी वाढ होऊन निरनिराळे अवयव व संस्था तयार होतात. या सर्व घटनाक्रमाला साधारणपणे 280दिवस लागतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्याअंतिम सुधारित : 8/13/2020
गर्भधारणा न होण्यास वंधत्व असे म्हणतात.वंध्यत्व हा...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात गर्भधारणा...
गाई-म्हशींमध्ये माज दाखवण्याची लक्षणे, प्रमाण आणि ...
गर्भधारणा झाल्यानंतर प्रसूती होईपर्यंतच्या मधल्या ...