उत्सर्जनसंस्था म्हणजे शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणा-या संस्था.
शरीरासाठी अन्नपाणी, हवा व वातावरणातील पदार्थ आत घेतले जातात. यांतले आवश्यक पदार्थ वापरून निरुपयोगी पदार्थ चार मार्गांनी बाहेर टाकले जातात.
मूत्रसंस्थेचे मुख्य अवयव म्हणजे दोन मूत्रपिंडे (किडनी), यांतून निघणा-या दोन नळया (मूत्रवाहिन्या) व लघवीची पिशवी (मूत्राशय). मूत्रपिंडात रक्तवाहिन्यांचे जाळे असते. रक्त मूत्रपिंडात आल्यानंतर तेथे ते गाळण्याची क्रिया होते. यामुळे पाणी, युरिया व काही क्षार बाजूला काढले जातात. हे मूत्र दोन मूत्रवाहिन्यांवाटे मूत्राशयात साठते. इथून ते वेळोवेळी मूत्रनलिकेवाटे बाहेर टाकले जाते. मूत्रपिंडाचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. दोनपैकी एक मूत्रपिंड बंद पडले तर चालते. कारण दुस-या मूत्रपिंडाकडून जादा काम घेऊन जीवन चालू शकते. पण दोन्ही मूत्रपिंडे बंद पडली तर मृत्यू ओढवतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
अन्नपचनाचे कार्य करणारी प्राण्यांतील संस्था.आदिजीव...
जनावरांची देखभाल करताना चारा, पाणी देण्यामध्ये काह...
ग्रसिका (घशापासून जठरापर्यंतचा अन्ननलिकेचा भाग) व ...
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असलेली अॅसिडिटी, अपचन,...