पूर्वी वृद्धावस्थेतील आजार म्हणून ओळखले जाणारे आजार हल्लीच्या जीवनशैलीमुळे तरुणपणीच उद्भवत आहेत. मानदुखी किंवा सर्व्हायकल स्पाँडिलिसिस हा त्यापैकीच एक.सर्व्हायकल स्पाँडिलिसिस या आजारात मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी येते. मानेत एकूण सात मणके असतात. त्यांच्या साह्यानेच
आपण मानेच्या हालचाली करू शकतो. या मणक्यांची झीज झाल्याने सर्व्हायकल स्पाँडिलिसिस उद्भवतो. यात मणक्यांतील अंतर कमी होणे, गादी झिजणे, मणका जागेवरून सरकणे (स्पाँडिलिस्थेसिस). नस दबली जाणे (नर्व्ह क्रॉम्प्रेशन) असे आजार यात होऊ शकतात.
सर्व्हायकल स्पाँडिलिसिसची कारणे
- सततचा वाहनांवरून प्रवास.
- कॉम्प्युटर/ मशीनवर काम करणे.
- व्यायामाचा अभाव, ओझे उचलणे.
- काही कारणामुळे मानेवर आघात होणे.
- शरीरात कॅल्शियमची कमतरता असणे.
लक्षणे अशी
- मान दुखणे, भोवळ येणे.
- पूर्णपणे मान वळवता न येणे.
- एक किंवा दोन्ही हातात मुंग्या येणे.
- हात बधीर होणे, क्वचित डोकेदुखी.
- हाताने वस्तू उचलता न येणे
वेदनाशामक औषधांनी तात्पुरते बरे वाटते.परंतु नंतर पुन्हा त्रास सुरू होतो. अनेक रुग्णांनाकॉलर बेल्टदेखील दिलेला असतो.
काय काळजी घ्यावी
- काम करताना, गाडी चालवताना कणा ताठ राहील अशा पद्धतीने बसावे.
- डोक्याखाली जाड उशी घेऊ नये, अधिक प्रवास, ओझे उचलणे टाळावे.
- कॉम्प्युटरवर काम करणाऱ्यांनी ठरावीक वेळेनंतर मानेच्या हालचाली कराव्यात.
- आहारात कॅल्शियम व फॉलकि अॅसिडयुक्त पदार्थांचे सेवन करावे
आयुर्वेदकि पंचकर्म उपचार
नस्य
नाकात विशिष्ट पद्धतीने औषधी द्रव्य
सोडण्याची पद्धत. अनेक रुग्णांवर अनुभवलेले संशोधित मन्यास्तंभ तेल नाकात योग्य पद्धतीने सोडल्यास रुग्णांना फायदा होतो. त्यामुळे मानदुखीच्या सर्व रुग्णांनी नस्यकर्म करावे.
औषधोपचार
मणक्यांची झीज भरून काढण्यासाठी आयुर्वेदात प्रभावी औषधी आहेत. घेण्यास सहज व सोपी असल्याने ती सर्व वयोगटातील रुग्णांना लाभदायक ठरतात. विशिष्ट औषधींनी सिद्ध तेल जेवणापूर्वी घेतल्यास वेदना, मुंग्या येणे, चक्कर येणे ही लक्षणे कमी होतात.
व्यायाम
उपचारात व्यायामदेखील महत्त्वाचा आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मानेचे काही व्यायाम केल्यास त्रास लवकर कमी होतो.
मन्याबस्ती
मानेवर औषधीद्रव्यांचे पाळे तयार करून त्यात औषधीयुक्त तेल सोडतात. यामुळे वेदना कमी होतात.
मन्यास्तंभ
आयुर्वेदात या त्रासाला मन्यास्तंभ म्हणतात. प्रामुख्याने हा वातामुळे होणारा आजार आहे. योग्य उपचाराने तो पूर्ण बरा होऊ शकतो.
संकलन - सुनील बाप्ते
स्रोत - http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-niramay-article-about-spondylosis-4731056-PHO.html