बीजांडे गर्भावस्थेत पोटात असतात व जन्माच्या आधी काही आठवडे अंडकोशात उतरतात. कधी कधी ही प्रक्रिया मध्येच थांबते. बीजांड (एक किंवा दोन्ही) जांघेत किंवा पोटातच राहतात.
इथले शरीराचे तपमान बीजांडाला मारक असते. हे लक्षात आल्यास लवकर डॉक्टरला दाखवले पाहिजे. शाळेच्या आरोग्यतपासणीतही ही तपासणी व्हायला पाहिजे. वेळीच शस्त्रक्रिया करुन बीजांड अंडकोशात न आणल्यास त्या बाजूचे बीजांड निष्क्रिय होते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्याअंतिम सुधारित : 7/9/2020
बीजांडाच्या रक्तवाहिन्या व चेतातंतू यांचा एक गठ्ठा...
बीजांडास अनेक प्रकारच्या गाठी येऊ शकतात. गाठ लहान ...