অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ

प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ

उतारवयात प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ होते. सर्वांनाच त्याचा त्रास होतो असे नाही. पण खूप जणांना साठीच्या आसपास हा त्रास होतो. याचे मुख्य लक्षण म्हणजे लघवीचा त्रास. रात्री लघवीसाठी वारंवार उठावे लागणे, कुंथावे लागणे, लघवी थेंब थेंब पडणे, लघवीतून रक्तस्राव होणे, इत्यादी अनेक प्रकारचा त्रास होतो. गुदद्वारातून बोट घालून तपासले असता प्रॉस्टेट ग्रंथींची वाढ आणि निबर-घट्टपणा जाणवतो. सोनोग्राफीने नक्की निदान होते. यातला लघवी अडकण्याचा त्रास तात्पुरता कमी करता येतो. गरम-कोमट पाण्याच्या टोपलीत बसून शेक दिल्यास लघवी मोकळी व्हायला तात्पुरती मदत होते. पण कायमचा उपाय शस्त्रक्रियेचाच. पोटातून शस्त्रक्रिया करण्याऐवजी मूत्रमार्गातून नळीद्वारे हत्यार वापरून ग्रंथी खरवडून काढली जाते. प्रॉस्टेट ग्रंथीला कर्करोगही होऊ शकतो व हा रोग आजूबाजूला लवकर पसरतो.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 7/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate