मुल जेव्हा छोटे असते तेव्हा रात्री त्याचे अंथरूण ओले होणे हे स्वाभाविक असते परंतु मुलाचे वय वाढल्यानंतरही रात्रीच्या वेळी अंथरूण ओले होत असेल, तर ते मुल आणि त्याच्या आई वडिलांसाठी संकोच आणि चिंतेचा विषय बनतो. सुदैवाने बहुतेक मुलांच्यात ही समस्या किडणीच्या कुठल्यातरी रोगामुळे होताना दिसत नाही.
हा त्रास म्हणजे कुठलाही रोग नाही आणि मूल जाणूनबुजूनही अंथरूण ओले करत नाही. त्यामुळे मुलाला भीती दाखवणे किंवा त्याच्यावर ओरडणे सोडून दिले पाहिजे आणि ह्या समस्येवर सहानुभूतीपूर्वक उपचारांना सुरुवात केली पाहिजे.
मुलाला ह्या विषयाबाबतची माहिती देणे अत्यंत आवश्यक असते. रात्री नकळत अंथरूण ओले होणे ही चिंताजनक समस्या नाही आणि ती नक्की ठीक होईल, अशा प्रकारे मुलाला समजावल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि ह्या समस्येवर त्वरित उपाय करण्यासाठी मदत मिळते. ह्या समस्येवर चर्चा करून मुलाला भीती दाखवणे किंवा वाईटसाईट बोलणे टाळले पाहिजे. ज्या रात्री मुल अंथरूण ओले करणार नाही, त्यादिवशी मुलांच्या प्रयत्नांची प्रशंसा करणे आणि त्यासाठी छोटे मोठे बक्षीस देणे, हि समस्या सोडवायला मदतच करते.
१) संध्याकाळी ६ वाजल्यानंतर द्रवपदार्थ कमी प्रमाणात घेतले पाहिजेत आणि चहा कॉफीसारखी कॅफेन असलेली पेये संध्याकाळी घेता कामा नयेत.
स्त्रोत : Kidney Education Foundation
अंतिम सुधारित : 5/4/2020
अल्सर म्हणजे काय, अल्सर कशाने होतो , अल्सरची लक्षण...
दर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आरोग्य सेवे...
काडातून थेट पेरणी करणाऱ्या यंत्राने पेरणी केली, की...
नुकत्याच घडलेल्या मॅगी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ...