दात तपासण्यासाठी एक चमचा (जीभ दाबण्यासाठी) व प्रकाशझोत लागतो. तपासताना खालील गोष्टींचे निरीक्षण करा.
दात निरोगी दिसतात ना? (दातावर दंतकवच पूर्ण आहे ना? की टवका गेलेला आहे?) नवीन दात येतोय का? दातावर काळसर डाग आहे काय? (काळा दात म्हणजे कामातून गेलेला दात.) हलणारा दात आहे काय? कोणत्याही दातावर कीड, पोकळी निर्माण झाली आहे काय? हिरडया निरोगी आहेत काय? (गुलाबी हिरडया निरोगी असतात, लाल असतील तर दाह आहे असे समजावे.) कधी दातावर पिवळसर किंवा काळसर रंग असतो, तो बहुधा तंबाखू-मिश्रीमुळे येतो. हिरडया निरोगी असतील तर दोन दातांच्या फटीमध्ये त्या वर चढलेल्या आणि टोकदार दिसतात. रोगट हिरडया दातांच्या मुळाशी घडी केल्यासारख्या दिसतात. घडीखाली जंतुदोष टिकून राहतो. दातांवर अस्वच्छ थर व पिवळे कीटण आहे का पाहा.दातांचे आरोग्य मोजण्यासाठी एक पध्दत म्हणजे किडलेले (पडलेले (Missing) आणि भरलेले (Filled) दात मोजणे. याला इंग्रजीत DMF गणना म्हणतात. विशेष करून दातांच्या सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो. स्वच्छतेच्या सवयी, खाण्याच्या सवयी, पाण्यातील फ्लोराईड, अनुवंशिकता, इत्यादी घटकांवर DMF ठरतो. DMFT हे कायमच्या दातांसाठी वापरायचे मोजमाप आहे. DMFT हे दुधाच्या दातांसाठी वापरतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
(अनेक) पृष्ठवंशी (आणि अपृष्ठवंशी) प्राण्यांच्या मु...
दात व तत्संबंधी तोंडातील भाग, ह्यांचे रोग व त्यावर...
मानवजातीत दात दोन वेळा येतात - दुधाचे आणि कायमचे
बहुधा पन्नाशीनंतर दात पडायला सुरुवात होऊन 10-20वर्...