घामोळया हा उन्हात लहान मुलांना होणारा त्रास आहे. घाम तयार करणा-या ग्रंथींची तोंडे बंद झाल्याने हा त्रास होतो. यात त्वचेवर बारीक पुरळ लालसरपणा आणि खाज ही लक्षणे दिसतात. हा त्रास बहुधा पाठीवर होतो. साधारणपणे काही दिवसांतच हा त्रास आपोआपच नाहीसा होतो. तोपर्यंत खोबरेल तेल चंदनलेप किंवा टाल्कम पावडर लावल्यामुळे आराम पडतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 8/19/2020