खरुज एक त्वचा रोग आहे जे सार्कोप्टीस स्केबीज नावाच्या एका परोपजीवाने (parasite) होतो. हे एक ०.३ एम एम एवढ्या लहान कीटकाने होते, ज्याला माईट (अत्यंत लहान जीव) असे म्हणतात. मादा परोपजीव आपल्या त्वचेच्या खाली बीळ खोदून संक्रमणाच्या 2-3 तासाच्या आत अंडी देण्यास सुरू करते आणि सुमारे 2-3 अंडी रोज घालते. ही अंडी उबवून दहा दिवसात मोठे जीव होतात ( हा शब्द परोपजीवाच्या ऐवजी वापरतात). खरुज हे एक सुमारे सांसर्गिक संक्रमण आहे जे एका छोटाश्या जीवामुळे होते (सार्कोप्टीस स्केबीज).
एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीला संक्रमण त्वचेच्या संसर्गात आल्याने होते. बहुधा जेव्हां एक जोडपे रात्री एकत्र असले तर. शक्यतः संक्रमण झालेले अंथरूण-पांघरूण वापरल्याने, संक्रमण झालेले कपडे वापरल्याने, किंवा रोजचे शिवा- शिवी जसे हात देणे किंवा हात पकडणे.
मादा परोपजीव आपल्या त्वचेच्या खाली बीळ खोदून संक्रमणाच्या काही तासांमध्ये अंडी देण्यास सुरू करते आणि सुमारे 2-3 अंडी रोज घालते. ही अंडी उबवून दहा दिवसात मोठे जीव होतात. लक्षण म्हणज़े, प्राथमिकतेने खाज, जे संक्रमणाच्या सुमारे चार आठवड्यांमध्ये दिसण्यास सुरू होते, कारण अप्रगल्भ जीवांचे अस्तित्व असल्यामुळे जागरुक होते.
स्केबीज असलेल्या व्यक्तीला तोपर्यंत संक्रमक म्हटले जाते जोपर्यंत त्यांचा उपचार होत नाही. संक्रमण झालेले कपडे आणि अंथरूण-पांघरूण धुतल्या जाण्यापर्यंत संक्रमक असतात. उपचार झाल्यानंतर, एक व्यक्ती खरुज झालेल्या किंवा सध्या असलेल्या व्यक्तीकडे जाऊन, नकळत परत संक्रमण करून घेऊ शकतात.
जीवाणूंचे बीळ असल्याने, लालसर तपकिरी गाठ किंवा जखम, आणि निरंतर खाज. खाज बहुतेक रात्री जास्त होते. खरजेमुळे नेहमी होणारे अधिक खाज हे त्वचेतच होणार्या प्रतिक्तियेने होते. पहिल्यांदा ज्या व्यक्तीला खरुजची लागण होते, त्यांना कोणतेही खाजाची लक्षणे काही आठवडे दिसून येत नाही (चार ते सहा आठवडे). परत परत लागण झाल्यास, पहिले जीव जंतू आपल्या शरीरात आल्या बरोबरच काही तासांमध्येच खाज सुरू होते. यद्यपि हे जीव मनुष्य त्वचा पासून थोडाच वेळ (तीन दिवस) जिवंत राहू शकतात, एकमेकांचे कपडे किंवा अंथरूण वापरल्याने खरुजचे जीव जवळ असणार्यांना किंवा घरच्या लोकांना पसरू शकते. मे २००२ मध्ये, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने खरुजला लैंगिक संबंधातून पसणार्या आजारांच्या उपचाराच्या मार्गदर्शिकेच्या यादी मध्ये सामिल केले आहे.
साधारणपणे या जागांमध्ये होते: हाता पायाच्या बोटांच्या मध्ये आणि बाजूला, मांडीच्या सांध्यांमध्ये, काखेत, कोपर्याच्या आणि गुढग्याच्या आतल्या बाजूंमध्ये, मनगटावर, नाभि, स्तन, नितंबाचा खालचा भाग, कधी कधी लिंग आणि अंडकोष, कंबर, पोट; हे कधी- कधी तळहातात, तळपायात आणि क्वचितच मानेच्या परच्या भागात होते. मे २००२ मध्ये, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने खरुजला लैंगिक संबंधातून पसणार्या आजारांच्या चिकित्साच्या मार्गदर्शिकेच्या यादी मध्ये सामिल केले आहे. खरुज असताना खाजवल्यास काही समाधान वाटते कारण त्याने खरुजचे जीव सुमारे काढले गेले जातात. बहुधा खरुजची लागण होण्यास एकत्रित १५ पेक्षा जास्त जीव लागत नाही.
जास्त प्रमाणात जीवाने जर लागण ( हजार ते लाखांमध्ये) तेव्हां होते जेव्हां ती व्यक्ती खाजवत नाही, किंवा त्या व्यक्तिची प्रतिकार शक्ती नाजुक असेल. हे असे व्यक्ती असतात जे काही संस्थानांमध्ये राहतात, जसे मानसिक रीतीने खुंटलेले, किंवा शारिरिक रीतीने असमर्थ असलेले; आणि काही आजार असलेले जसे ल्यूकेमिया किंवा मधुमेह; काही औषधोपचार घेत असलेले ज्याने त्यांचे प्रतिकार शक्ती कमी होते, कर्करोग केमोथेरपी, इंद्रिय स्थानांतरण केल्यानंतर दिले जाणारे औषध; किंवा इतर आजार असणे ज्याने रोगप्रतिकार शक्ती कमी होते (जसे ऑकवायर्ड इम्यूनो डेफीशियंसी सिंड्रोम एड्स AIDS). असा प्रकारचा खरुज, प्रमुख पर्याक्रमणासह, याला पापडीदार खरुज (क्रस्टेड स्केबीज) किंवा नॉर्वेजीयन स्केबीज असे म्हणतात. लागण झालेले व्यक्तींना पूर्ण शरीरात जाड, पापडीदार चट्टे असतात, डोक्यावर सुद्धा. त्यांची त्वचा खवलेदार असते. त्यांचे नख जाड आणी शिंगासारखे टोकदार असू शकतात.
केवळ खरुजच्या जीवाने विशिष्ट प्रकाराने खोदलेले बीळ पाहून याचे निदान करू शकतो. एक जंतुरहित सुईने बीळाच्या अखेरीस असलेले मोतीसारखे टेंगूळ फोडून, त्यात असलेले घटक काढून काचेच्या स्लाईडवर ठेऊन परीक्षण करू शकतो. मायक्रोस्कोपच्या खाली खरुजचे जीव देखील दिसू शकतात.
कधी कधी, एक प्रकारचा जीव जो कुत्र्यांवर दिसला जातो (सार्कोप्टिस स्केबी वरायटी केनिस) हा मनुष्यांना सुद्धा संक्रमण होऊ शकतो. हे जीव मनुष्यांवर दीर्घकाळ जिवंत राहू शकत नाही, म्हणूनच हे संक्रमण फार सौम्य असते.
अनेक प्रकारचे लोशन (बहुदा ५% पर्मेथ्रिन असणारे) अंगावर लावू शकतो, आणि १२ ते २४ तास तसेच सोडू शकतो. एकदा त्वचेवर लोशन लावल्यावर पुरेसे असते, यद्यपि स्कॉबिसाईड एका आठवड्यानंतर परत लावू शकतो जर जीव राहिले असले तर. केलामाईन लोशन लावल्याने किंवा ऑन्टी हिस्टामाईन औषधाने खाज कमी करू शकतो.
खरुज टाळण्यासाठी चांगल्या प्रकारची स्वच्छता आवश्यक आहे. जसे रोज आंघोळ करणे, स्वच्छ धुतलेले कपडे घालणे, दुसर्यांनी वापरलेले कपडे आपण न वापरणे. सर्वांनी एकदम उपचार घेतले पाहिजेत. जर कुटुंबातल्या एका व्यक्तीला खरुजचे निदान झाले असले तर त्या व्यक्तीने नुकतेच गेले काही दिवसात वापरलेले कपडे आणि अंथरूण-पांघरूण जास्त गरम पाण्यात धुतले गेले पाहिजेत आणि चांगल्या कडक उन्हात वाळवले पाहिजेत.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 6/25/2020
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...