देबाशिष पांडा, सचिव, वित्तीय सेवा विभाग.हे देखील उपस्थित होते. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजचे घटक खालीलप्रमाणे आहेत:
सरकारी रुग्णालये आणि आरोग्य सेवा केंद्रांमध्ये कोविड -19 चा सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना
2020-21 मध्ये थकित असलेल्या 2,000 रुपयांचा पहिला हप्ता एप्रिल २०२० मध्ये पंतप्रधान किसान योजनेंतर्गत खात्यात जमा केला जाईल. यात 8.7 कोटी शेतकऱ्यांचा समावेश असेल.
गरीबांना मदत: एकूण 20.40 कोटी पीएमजेडीवाय महिला खातेदारांना पुढील तीन महिन्यांसाठी दरमहा 500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
गॅस सिलिंडर: पीएम गरीब कल्याण योजनेंतर्गत 8 कोटी गरीब कुटुंबांना पुढील तीन महिन्यांत विनामुल्य गॅस सिलिंडर्स देण्यात येतील.
संघटित क्षेत्रात कमी वेतन मिळणाऱ्यांना मदत: 100 पेक्षा कमी कामगार असलेल्या व्यवसायात दरमहा 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन मिळवणाऱ्यांना त्यांचा रोजगार गमावण्याचा धोका आहे. या पॅकेजअंतर्गत, मासिक वेतनाच्या 24 टक्के रक्कम पुढील तीन महिन्यांसाठी त्यांच्या पीएफ खात्यात देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. यामुळे त्यांच्या रोजगारामध्ये अडथळा येणार नाही.
ज्येष्ठ नागरिक (60 वर्षांपेक्षा जास्त), विधवा आणि दिव्यांग यांना आधारः दिव्यांग श्रेणीत सुमारे 3 कोटी वृद्ध विधवा आणि लोक आहेत जे कोविड -19.मुळे उदभवलेल्या आर्थिक संकटामुळे असुरक्षित आहेत. पुढील तीन महिन्यांत या अडचणींना सामोरे जाण्यासाठी सरकार त्यांना 1,000 रुपये देईल.
मनरेगा : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत 1 एप्रिल 2020 पासून मनरेगाच्या वेतनात 20 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. मनरेगा अंतर्गत वेतनवाढीमुळे कामगारांना वार्षिक 2 हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळू शकेल. याचा फायदा सुमारे 13.62 कोटी कुटुंबांना होईल.
63 लाख बचत गटांच्या माध्यमातून संघटित महिला 6.85 कोटी कुटुंबांना मदत करतात. कुठल्याही तारणाशिवाय दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढविण्यात येईल
संघटित क्षेत्र:
कर्मचाऱ्यांच्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या नियमात दुरुस्ती केली जाईल आणि यात महामारी या कारणामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यातून 75 टक्के रक्कम किंवा तीन महिन्यांच्या पगारा इतकी रक्कम काढता येईल आणि त्याची परतफेड करावी लागणार नाही. ईपीएफ अंतर्गत नोंदणीकृत चार कोटी कामगारांची कुटुंबे या विंडोचा लाभ घेऊ शकतात.
इमारत आणि अन्य बांधकाम कामगार कल्याण निधी: केंद्र सरकारच्या कायद्यानुसार इमारत आणि अन्य बांधकाम कामगारांसाठी कल्याण निधी तयार करण्यात आला आहे. या निधीमध्ये सुमारे 3.5 कोटी नोंदणीकृत कामगार आहेत. या कामगारांचे आर्थिक अडचणींपासून संरक्षण करण्यासाठी मदत आणि पाठबळ देण्यासाठी या निधीचा उपयोग करण्याचे राज्य सरकारांना निर्देश देण्यात येतील.
जिल्हा खनिज निधी : राज्य सरकारला जिल्हा खनिज निधी (डीएमएफ) अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीचा वापर कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी तसेच वैद्यकीय चाचणी, तपासणी आणि इतर आवश्यक सुविधा वाढवण्यासाटी तसेच पीडित रूग्णांवर उपचारासाठी करायला सांगितले जाईल.
अंतिम सुधारित : 7/27/2020