क्वॉरंटीन म्हणजे रोग किंवा कीटकांचा प्रसार रोखण्यासाठी लोक आणि वस्तूंच्या हालचालींवर प्रतिबंध लावणे. क्वॉरंटीन पद्धती सहसा रोग आणि आजारपणाच्या बाबतीत वापरली जाते, यामध्ये ज्यांना संसर्गजन्य रोगाचा धोका आहे पण ज्यांच्या वैद्यकीय निदानाची पुष्टी झालेली नाही,अशा लोकांच्या हालचाली प्रतिबंधित केल्या जातात. हा शब्द बर्याचदा वैद्यकीय विलगीकरणाला पर्याय म्हणून वापरला जातो. यात ज्या लोकांना संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याची पुष्टी झालेली आहे ते लोक निरोगी लोकांपासून वेगळे केले जातात.
सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग ) किंवा शारीरिक अंतरण हा एक गैर-औषधी हस्तक्षेप किंवा लोकांमधील शारीरिक अंतर राखून आणि लोक एकमेकांशी जवळीक साधण्याचे प्रमाण कमी करून एखाद्या संक्रामक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपायांचा एक समूह आहे. यात इतरांपासून कमीतकमी दोन मीटर अंतर ठेवणे आणि मोठ्या गटात एकत्र जमणे टाळणे यांचा समावेश आहे.
जागतिक आरोग्य संघटना, यांच्या मते सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे नागरिकांनी 1 मीटर किंवा 3 फुटांचं अंतर एकमेकांमध्ये ठेवलं पाहिजे, जेणे करून जर समोरची एखादी व्यक्ती खोंकली किंवा शिंकली तर त्यांच्यातून निघणाऱ्या द्रव्याचा तुम्हाला संसर्ग होणार नाही. शासन सध्या सोशल डिस्टन्ससिंग करावं यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे कारण त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होऊ शकते. विविध गोष्टी बंद करण्यामागे, किंवा सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलण्यामागे सोशल डिस्टन्ससिंग करणं हे एकमेव कारण आहे. सोशल डिस्टन्ससिंग केल्याने जास्त लोंक एकमेकांच्या संपर्कात येत नाही आणि त्यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होऊ शकते.
स्रोत- www.cdc.in
अंतिम सुधारित : 4/17/2020