या विषाणूचा घसा आणि फुफ्फुसाच्या सर्वात बाह्यस्तरात असलेल्या (epithelial cells) पेशींना संसर्ग होतो. सार्स-कोव्ह-२ घसा आणि फुफ्फुसांमध्ये आढळणाऱ्या मानवी पेशींवरील एस२ रिसेप्टर्सना चिकटतात. तुमच्या त्वचेवर एस-२ रिसेप्टर्स नसल्याने तिथे हे विषाणू निरुपद्रवी असतात. हा विषाणू नाकाची पोकळी, डोळे आणि तोंड यामधून शरीरात प्रवेश करतो. आपले हात या विषाणूचे प्रमुख वाहक असून ते या विषाणूला आपले तोंड, नाक आणि डोळे यांच्यापर्यंत पोहोचवायला मदत करतात. शक्य होईल तितके नियमित साबणाने हात वीस सेकंद धुत राहिल्यास या विषाणू संसर्गाला प्रतिबंध होतो.
एका मकाकला (माकडाला) संसर्ग होण्यासाठी 7,00,000 पीएफयूची (प्लाक फॉर्मिंग युनिट) गरज होती. पीएफयू हे नमुन्यातील संसर्गाची मोजणी करण्याचे परिमाण आहे. जरी त्या प्राण्यामध्ये कोणतीही वैद्यकीय लक्षणे दिसत नव्हती, तरीही त्याच्या नाकातील आणि लाळेतील तुषारांमध्ये विषाणूंचा साठा होता. मानवाला संसर्ग होण्यासाठी 7,00,000 पीएफयूपेक्षा जास्त मात्रेची गरज असते. जनुकीय बदल केलेल्या एस-2 रिसेप्टर्स असलेल्या एका उंदरावर केलेल्या प्रयोगात असे आढळले की केवळ 240 पीएफयूद्वारे या उंदराला संसर्ग होत होता. त्या तुलनेत नोवेल कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यासाठी 70,000 पीएफयू इतक्या मात्रेची गरज असते.
एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे किती काळामध्ये संक्रमण होऊ शकते हे अगदी अचूकपणे सांगता येणार नाही, पण साधारणपणे 10 ते 14 दिवसांचा हा कालावधी असतो. एकंदर संक्रमणांमध्ये घट करण्यासाठी कृत्रिम पद्धतीने संक्रमण कालावधी कमी करण्याची एक महत्त्वाची पद्धत आहे. रुग्णालयात दाखल करणे, अलगीकरण, लॉकडाऊन आणि विलगीकरण या अतिशय प्रभावी पद्धती आहेत.
या विषाणूचा संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीकडून लक्षणे दिसण्यापूर्वीच दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो. अशा बहुतेक वाहकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसतही नाहीत. खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड झाकून घेतले तर संसर्गाचे प्रमाण कमी व्हायला मदत होऊ शकते. हा विषाणू, ज्या व्यक्तीला संसर्ग झाला आहे त्या व्यक्तीमधील संपूर्ण संसर्गकाळात तिची लाळ,थुंकी आणि विष्ठा यामध्ये हा विषाणू अस्तित्वात असतो.
बहुधा थेंबांवाटे संक्रमण होतो. यासाठी सहा फुटांपेक्षा कमी अंतरामधील अतिशय जवळून होणाऱ्या संपर्काची गरज असते. त्यामुळेच भाजी बाजार, सुपर मार्केट अशा सार्वजनिक ठिकाणी आपण एकमेकांपासून सुमारे 1.5 मीटर अंतरावर राहावे, अशी सूचना केली जाते. हाँगकाँगमध्ये केलेल्या संशोधनातून असे आढळले की सोशल डिस्टन्सिंग म्हणजे परस्परांपासून सुरक्षित अंतर राखल्याने फैलाव 44% नी कमी होऊ शकतो. आजाराचे निर्जिव व्हेक्टर फोन, दरवाजांच्या मुठी यांसारख्या पृष्ठभागांवर असतात आणि ते संक्रमणाचे प्रमुख स्रोत असू शकतात, मात्र याविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही. दाराच्या मुठींना, लिफ्टमधील बटणांना आणि सार्वजनिक ठिकाणी असलेले काउंटर यांना स्पर्श केल्यावर हातांना निर्जंतुक करणे सुरक्षित असते.
संसर्ग झालेल्या एका व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होण्याची सरासरी संख्या म्हणजे मानवी संक्रमण पल्ला 2.2 ते 3.1 यांच्या दरम्यान आहे. म्हणजे संसर्ग झालेली एक व्यक्ती साधारणपणे 2.2 ते 3.1 व्यक्तींना संसर्ग पोहोचवू शकते. प्रत्यक्षात लोकांमध्ये अंतर राखून आपण वास्तविक संक्रमणात कपात करू शकतो आणि त्यामुळे संसर्गाचा दर कमी होऊ शकतो.
स्रोत- कृषी जागरण
अंतिम सुधारित : 4/24/2020