मध्यकर्णाच्या आजाराने (सूज-पू- दाहाने) कधीकधी अंतर्कर्णात आजार शिरून ध्वनिशंखाला जंतुदोष होतो व सूज येते. अंतर्कर्णाला सूज असेल तर चक्कर आणि मधूनमधून उलटया ही मुख्य लक्षणे दिसतात. अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब कानाघ तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. अंतर्कर्णाच्या अनेक प्रकारच्या आजारांत चक्कर येणे, उलटया होणे, कानात सूक्ष्म गुणगुण होत राहणे, इत्यादी त्रास होतो. अशा आजारात बहिरेपणा असेलच असे नाही. ही लक्षणे दिसली तर रुग्णास तज्ज्ञाकडे पाठवून द्या.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/20/2020