प्रास्ताविक पूर्वी ज्याला मज्जासंस्था म्हणत त्याला आता चेतासंस्था असे नाव आहे. मेंदू, चेतारज्जू आणि नसा (म्हणजे चेतातंतूंचे गट्ठे) हा आपल्या शरीरातला अत्यंत नाजूक व गुंतागुंतीचा भाग आहे.
शरीरातल्या सर्व क्रियांवर याचे नियंत्रण असते. या संस्थेच्या आजारात शरीराच्या इतर कोठल्या ना कोठल्या तरी भागावर परिणाम होतोच. म्हणून मेंदूचा एखादा भाग आजारी वा बिघडला आहे हे शरीरावरच्या दुष्परिणामांवरून बहुधा ओळखता येते. उदा. मेंदूत रक्तस्राव झाला तर अर्धांगवायू होतो. चेतासंस्थेच्या आजारांत अनेक प्रकार व कारणे आहेत.
आपल्याला चेतासंस्थेच्या ब-याच भागांचे हळूहळू ज्ञान होत आहे. चेतासंस्थेच्या आजारांचे परिणाम निरनिराळया प्रकारचे असतात. एखाद्या विशिष्ट भागावर मुंग्या येणे, झटके, बधिरपणा, शक्ती कमी होणे, लुळेपणा,अनैच्छिक हालचाली, स्नायू ताठ होणे, स्नायू निकामी व लहान होत जाणे, एखाद्या विशिष्ट इंद्रियाचे कामकाज बिघडणे किंवा बंद पडणे (उदा. दृष्टी जाणे, बहिरेपणा, इ.) तोल जाणे, स्मरणशक्ती, विचारशक्ती, बोलणे, इत्यादी मानसिक,बौध्दिक, भावनिक क्रिया मंदावणे किंवा बंद पडणे, इत्यादी अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसू शकतात.
या मुख्य परिणामांशिवाय इतर संस्थांच्या आजारात दिसणारी लक्षणे व चिन्हे (उलटया, ताप, बेशुध्दी, इ.) दिसू शकतात. आजाराची सुरुवातीपासूनची वाटचाल आणि दिसणारे परिणाम याचा सांगोपांग विचार करूनच रोगनिदान करण्यात येते. निदानासाठी खास तपासणीचा आधार घ्यावाच लागतो. (उदा. पाठीच्या कण्यातल्या चेतारज्जूच्या भोवतालच्या पोकळीतील पाणी काढून तपासणे, क्ष-किरण चित्र, स्कॅन, इ.) चेतासंस्थेचे आजार हा खास तज्ज्ञांचा विषय आहे. पण निवडक आजारांची सर्वांनाच माहिती असणे आवश्यक आहे.
स्त्रोत: आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...