ट्रिपोनेमा पॅलिडम या रंगविहीन मळसूत्राकार जंतूच्या संसर्गामुळे होणाऱ्या सार्वदेहिक रोगाला‘उपदंश’, ‘गरमी’, अथवा ‘फिरंग रोग’ असे म्हणतात. या रोगाचा संसर्ग मुख्यत्वे संभोगाद्वारे होतो. हा रोग पाश्चात्य देशांतून भारतात आला. पोर्तुगीज लोकांना पूर्वी फिरंगी असे म्हणत असल्यामुळे या रोगास फिरंग रोग हे नाव पुढे तीन वर्षेपर्यंत त्यांना होत गेलेली सर्व लक्षणे विस्ताराने वर्णिली आहेत. वैद्यकशास्त्रात असा धाडसी प्रयोग करून शास्त्रज्ञाने स्वतःचे मरण जवळ ओढवून घेतल्याचे हे संस्मरणीय उदाहरण आहे.
उपदंश जंतू
या रोगाचा जंतू ट्रिपोनेमा पॅलिडम हा सारख्या अंतरावर ८ ते १५ वेटोळी असलेला आणि सु. ५ ते २० मायक्रॉन (१०-६मीटर) लांब असतो. या जंतूचे नेहमी वापरात असलेल्या रंजकद्रव्यांनी रंगवून सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले, तरी तो दिसू शकत नाही; परंतु कृष्णक्षेत्रदीप्ति-परीक्षेने (सूक्ष्मदर्शकातील दृष्टीक्षेत्राच्या मध्यभागी अंधार करून फक्त बाजूने प्रकाश पाडून करावयाच्या परीक्षेने) तो दिसू शकतो. जंतुनाशके, साबण, उष्णता आणि निर्जलीकरण यांमुळे हा जंतू त्वरीत नष्ट होतो. शरीराबाहेर कृत्रिम माध्यमावर या जंतूचे प्रजनन अजून शक्य झालेले नाही. शीतपेटीत ठेवलेल्या रक्तात तो फार तर २-३ दिवसच जगू शकतो.
संभोगाखेरीज इतर कारणांनी या जंतूंचा संसर्ग होणे शक्य असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र संभोगामुळेच मुख्यतः या रोगाचा प्रसार होतो. त्वचा आणि श्लेष्मकला (आतड्यासारख्या अंतर्गत इंद्रियाच्या आतील भागावरील बुळबुळीत अस्तर) अभेद्य आहे तोपर्यंत हा जंतू शरीरात प्रवेश करू शकत नाही, परंतु अतिसूक्ष्म अशा ओरखड्यातून प्रवेश करून तो लसीका मार्गाने [स्वच्छ, पिवळसर व रक्तातील पांढऱ्या पेशींनीयुक्त असलेला द्रव वाहून नेणाऱ्या मार्गाने, → लसीका तंत्र] सर्व शरीरभर पसरू शकतो.
अवस्था
वेळीच योग्य उपचार न झाल्यास या रोगाच्या एकीमागून एक अशा पुढील तीन अवस्था दिसतात
प्रथमावस्था
ओरखड्यातून जंतुप्रवेश झाल्यानंतर सु. तीन ते सहा आठवड्यांच्या परिपाक कालानंतर, जेथे जंतुप्रवेश झाला त्या जागी प्राथमिक क्षत अथवा व्रण (जखम) उत्पन्न होतो. शिश्नत्वचेवर अथवा योनिमुखापाशी प्रथम लाल फोड येतो. तो गव्हाच्या आकाराचा आणि टणक असून लौकरच त्याच्या पृष्ठभागावर व्रण तयार होतो. या व्रणाच्या तळाशी आणि कडांवर शुभ्र तंतू ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या पेशींचा येथे शुभ्र तंतुमय पेशींचा समूह) उत्पन्न होत असल्यामुळे हा व्रण हाताला कठीण लागतो म्हणून त्याला कठीण रतिव्रण असे नाव पडले आहे. हा व्रण वेदनारहित असून त्याचा पृष्ठभाग कणात्मक (रवाळ) आणि लाल रंगाचा दिसतो. व्रणाच्या जवळच्या लसीकाग्रंथी मोठ्या होतात पण दुखत नाहीत अथवा त्यांमध्ये पू होऊन विद्रधी (पूयुक्त फोड) होत नाही. हा व्रण काही काळाने आपोआप बरा होत असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याचा संभव असतो.
द्वितीयावस्था
प्राथमिक व्रणोत्पत्तीनंतर सु. चार ते सहा आठवड्यांनी त्वचेवर पीटिका (लाल फोड) उत्पन्न होतात. या पीटिका प्रथम छाती व पोट यांवर दिसतात व पुढे सर्वांगावर पसरतात. या पीटिका प्रथम लाल रंगाच्या असून त्यांच्या भोवती सूज नसते. तोंडात, घशात आणि जननेंद्रियावरही अशा पीटिका उठतात. या पीटिकांमधील लसीकेत सर्पिल जंतू सापडतात.
डोकेदुखी, अस्वस्थपणा आणि संधिशोथ (सांध्याची दाहयुक्त सूज) ही लक्षणेही या अवस्थेत दिसतात. विशेषतः हाडांमध्ये रात्रीच्या वेळी वेदना होतात. सर्व शरीरातील लसीकाग्रंथी मोठ्या झालेल्या असतात. विशेषतः मानेच्या पश्च त्रिकोणात आणि कोपराच्या वरच्या बाजूची लसीकाग्रंथी हाताला लागू लागते. नेत्रपटलशोथ (डोळ्यातील थरांची दाहयुक्त सूज), परिमस्तिष्कशोथही (मेंदू भोवतीच्या आवरणाची दाहयुक्त सूजही) होऊ शकतो.
तृतीयावस्था
ही अवस्था सुरुवातीपासून सु. दहा ते वीस वर्षांनंतर दिसते. सर्व शरीरातील सूक्ष्म रोहिण्यांच्या अंतःस्तराला शोथ आल्यामुळे या अवस्थेतील लक्षणे सार्वदेहिक असतात. शरीरात कोठेही चिकट व घट्ट अशी अर्बुदे (पेशींच्या अतिरिक्त वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठी) उत्पन्न होतात; त्यांना रत्यर्बुदे असे म्हणतात. त्वचा, श्लेष्मकला, अस्थी वगैरे ठिकाणी अशी अर्बुदे होतात. सांध्यामध्ये द्रव साठून थोड्याच दिवसांत सर्व सांधा विरघळून गेल्यासारखा होतो. स्वरयंत्र (आवाज उत्पन्न करणाऱ्या दोन तंतूंचे बनलेले घशातील इंद्रिय) आणि पचन तंत्रातील (पचन संस्थेतील) इंद्रियांतील अशीच अर्बुदे उत्पन्न होतात. परिमस्तिष्क व मस्तिष्कातील (मेंदूतील) विविध केंद्रांमध्ये विकृती झाल्यामुळे झटके, पक्षाघात वगैरे लक्षणेही दिसतात. मेरुरज्जूच्या (पाठीच्या कण्याच्या पोकळीतून गेलेल्या दोरीसारख्या मज्जारज्जूच्या) एखाद्या खंडकात शोथ झाल्यामुळे कमरेपासून खालच्या भागत पक्षाघात होतो व मलमूत्रोत्सर्गावरील नियंत्रण नाहीसे होते. या अवस्थेच्या शेवटी केंद्रीय तंत्रिका तंत्रात (केंद्रीय मज्जासंस्थेत) विकृती होऊन मस्तिष्कातील कोशिकांचा नाश झाल्यामुळे रोग्याच्या व्यक्तिमत्वात बदल दिसू लागतो. निद्रानाश, स्मृतिभ्रंश, चिडखोरपणा आणि विपरीत वागणूक दिसू लागते; तसेच मनोविकृती, वैचारिक गोंधळ वगैरे मानसिक विकार अथवा बढाई एखाद्या खंडकात शोथ झाल्यामुळे कमरेपासून खालच्या भागत पक्षाघात होतो व मलमूत्रोत्सर्गावरील नियंत्रण नाहीसे होते.
या अवस्थेच्या शेवटी केंद्रीय तंत्रिका तंत्रात (केंद्रीय मज्जासंस्थेत) विकृती होऊन मस्तिष्कातील कोशिकांचा नाश झाल्यामुळे रोग्याच्या व्यक्तिमत्वात बदल दिसू लागतो. निद्रानाश, स्मृतिभ्रंश, चिडखोरपणा आणि विपरीत वागणूक दिसू लागते; तसेच मनोविकृती, वैचारिक गोंधळ वगैरे मानसिक विकार अथवा बढाई खोरपणा, बडबड वगैरे लक्षणेही दिसतात. या प्रकाराला मनोविकृत सर्वांगवध (मनाच्या विकृतींबरोबरच सर्वांगावरून वारे जाणे) असे नाव आहे.
स्त्रोत:
मराठी विश्वकोश