অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एरोबिक्स

एरोबिक्स

ज्या व्यायामात शरीराला मोठया प्रमाणात हवा वापरावी (प्राणवायू) लागते त्यांना एरोबिक्स (दमसांस) प्रकारचे व्यायाम म्हणतात. मराठीत त्याला खास शब्द नाही. यासाठी आपण 'हवाहवासा' किंवा फक्त 'हवासा' शब्द वापरू या. लांब अंतर धावणे, पोहणे, दोरीवरच्या उडया, दंडबैठका, सायकलिंग, लेझिम, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, डोंगर चढणे वगैरे व्यायामप्रकार 'हवासा' प्रकारचे आहेत. आपण स्नायूंचा व्यायाम करायला लागतो (उदा.पळणे), तेव्हा पहिले काही सेकंद स्नायू स्वतःचा राखीव ऊर्जा-प्राणवायू साठा वापरतात. त्यानंतर मात्र रक्तातून ऊर्जा, प्राणवायू पुरवल्याशिवाय काम चालत नाही. यामुळे अर्थातच हृदय व फुप्फुसे जास्त काम करायला लागतात. यालाच 'दम लागणे' असे म्हणतात. या प्रकारच्या व्यायामात हृदय-फुप्फुसांचे काम आपोआप वाढते, तसेच यात खूप ऊर्जा-प्राणवायू खर्च होतात. यामुळे शरीरातले ऊर्जासाठे वापरले जातात. कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी असा व्यायाम दम लागल्यानंतरही 8-10 मिनिटे तरी करीत राहणे आवश्यक आहे. चरबी कमी होण्यासाठी मात्र यानंतर 15 मिनिटांपेक्षा पुढचा व्यायाम उपयोगी पडतो.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate