पंचमहाभूताचे प्रतिनिधित्व
भारतीय विचारपरंपरा आणि आयुर्वेदानुसार सर्व जीवसृष्टी ही पंचमहाभूतांपासून (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) बनलेली आहे. शरीराची आकृती, घनत्व, गंध, (वास), इत्यादी गोष्टी पृथ्वीतत्त्वापासूनः होतात. रसत्व, जलत्व, रुचिज्ञान आपतत्त्वापासून येतात. वर्ण, रूप, उष्णत्व हे तेजतत्त्वापासून; आणि हालचाल वायुतत्त्वापासून येतात. पोकळया (स्त्रोतस) आणि पोकळ मार्ग आकाशतत्त्वापासून होतात. असे आपले शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. ज्ञानेंद्रियेही एकेका पंचमहाभूताचे प्रतिनिधित्व करतात. याप्रमाणे दृष्टीज्ञान-तेजतत्त्व, ध्वनिज्ञान - आकाशतत्त्व, रुचिज्ञान -आपतत्त्व. हालचाल, स्पर्शज्ञान-वायुतत्त्व. गंध, वास- पृथ्वीतत्त्व असा संबंध आहे.
पंचमहाभूतापासून होणारे दोष
पंचमहाभूतांपासून त्रिदोष तयार होतात असा यापुढचा सिध्दान्त आहे. पृथ्वी आणि आप यांपासून मुख्यतः कफदोष, तेजापासून पित्तदोष, वायू-आकाश यांपासून वातदोष तयार होतो असे मांडले जाते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या