संपूर्ण कृतिपत्रिकेमध्ये गदय, पदय, स्थूलवाचन, व्याकरण व उपयोजित लेखन या ५ घटकांमधून आकलनकृती, व्याकरण कृती, स्वमत, काव्यसौंदर्य, भावार्थ व लेखनकौशल्य अवांतर वाचन, आकलन, निरीक्षण, चिकित्सक विचार, स्वकल्पना, भावना, सृजनशीलता व स्वानुभव यांची स्वतःच्या शब्दांत अभिव्यक्ती या क्षमतांचे मूल्यमापन अपेक्षित आहे.
भाषा रुजविणा-या शिक्षकांचे व भाषा 'विषय' म्हणून इ. १०वी च्या परीक्षेच्या म्हणजेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेच्या उंबरठ्यावर मनापासून स्वागत!
मार्च २०१७ मध्ये होणारी शालान्त परीक्षा ही भाषा विषयांच्या बदलत्या मूल्यमापन पद्धतीनुसार होणारी पहिली परीक्षा आहे.
प्रश्नपत्रिकेकडून कृतिपत्रिकेकडे व स्मरणाकडूनअभिव्यक्तीकडे- नेणारा हा बदल आता सर्वपरिचित झालेला विषयक आकलन कृतींद्वारे जाणून घेणा-या, पाठाचा आशय पाठ करून लिहिण्यापेक्षा तो समजून त्याबाबत आकलन व स्वमत मांडणे त्याचबरोबर शालेय व शालाबाह्य जीवनाशी निगडीत विषयांवरही निरीक्षण, चिकित्सक विचार, व अनुभव यांनी तयार झालेले स्वत:चे मत- स्व विचारांच्या अभिव्यक्तिला प्राधान्य देणारा विशेषत: उपयोजित लेखन विभागावर भर देणारा हा बदल समाज,
शिक्षक व मुख्यतः विदयार्थी यांचेकडून सहर्ष, सकारात्मकतेने स्वीकारला गेला असा अनुभव आहे.
बदलत्या मूल्यमापन पद्धतीमुळे अध्यापनही ज्ञानरचनावादी व कृतियुक्त अभ्यापन पध्दती
आता प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष कृतिपत्रिका सोडविताना काय अपेक्षित धरावे? स्वमत वा अभिव्यक्ती (उपयोजित लेखन) या व्यक्तिसापेक्ष लेखनाचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ कसे करता येईल याचा अभिव्यक्तीच्या घटकांमधून तसेच स्वमतच्या प्रश्नांमधून विदयार्थ्यांच्या स्वतंत्र विचार निरीक्षण सृजनशिलता, कल्पनारम्यता व स्वानुंभव यांच्या स्वतःच्या शब्दात केलेंडर अभिव्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल हे निश्चित असल्यामुळे बरेच पालक व शिक्षक सुध्दा या प्रश्नांच्या मूल्यमापनातील वस्तुनिष्ठतेबददल साशंक आहेत तशी अनेकांनी विचारणाही केली आहे.
लेखन व्यक्तिसापेक्ष (प्रत्येक विदयार्थ्यां चे लेखन वेगळे असणे) अपेक्षित असले तरी मूल्यमापनात मात्र वस्तुनिष्ठता, एकवाक्यता असेल तरच विदयार्थ्यांना न्याय मिळेल, कृतिपत्रिकाचे परीक्षण योग्य होईल हे निर्विवाद आहे. ते तसेच होणे आवश्यक ही आहे. म्हणूनच कृतिपत्रिका सोडविताना विदयार्थ्यांकडून मंडळाला काय अपेक्षित आहे व शिक्षकांनी त्याचे मूल्यमापन करताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य दयावे, मूल्यमापन पद्धतीच्या बदलामागील मूळ हेतू साध्य करण्यासाठी हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. व हाच या लेखाचा हेतूही आहे.
मंडळाकडून सदर बदल सर्वच भाषा विषयांच्यासाठी करण्यात आलेले आहे. मूल्यमापनाचे निकषही प्रत्येक भाषेचा स्वतःचा बाज लक्षात घेता येणा-या वेगळेपणातही बहुतांशी समानच आहेत.
सदर लेखात सर्व भाषा विषयातील (प्रथम, द्वतीय, संयुक्त) घटक लक्षात घेऊन त्याबाबतच्या अपेक्षा मांडल्या आहेत. अर्थात सर्व भाषा विषयांबाबत (अपवाद वगळता) त्या समानच आहे हे पुन्हा अधोरेखित व्हावे.
कृतिपत्रिकेचा आराखडा आपल्याला सर्वांना सुपरिचित आहे. त्याची येथे पुनरावृत्ती टाळायलाच हवी.
एकूण संपूर्ण कृतिपत्रिकेमध्ये गदय, पदय, स्थूलवाचन, व्याकरण व उपयोजित लेखन या ५ काव्यसौंदर्य, भावार्थ व लेखनकौशल्य यांवर आधारित कृतींचा समोवश आहे. यामधून अवांतर वाचन, आकलन, सृजनशीलता व स्वानुभव यांची स्वतःच्या शब्दांत अभिव्यक्ती या क्षमतांचे मूल्यमापन अपेक्षित आहे.
याप्रमाणे घटक व अपेक्षा लक्षात घेतल्यावर त्यांच्या मूल्यमापनाच्या निकषांचा विचार करू
कृतीचे उत्तर कृतीतील सूचनेप्रमाणेच असावे. सूचनेचे तंतोतंत पालन आवश्यक आहे. आकृत्या काढून घेणे आवश्यक आहे. त्या पेनानेच काढणे अपेक्षित आहे. (पेन्सिलने काढण्यात विदयार्थ्यांचा वेळ जास्त जाऊ शकतो.) कृती पुन्हा लिहून घेण्याची आवश्यकता नाही. लेखन व्याकरणदृष्ट्या अचूक असणे अपेक्षित आहे.
व्याकरण कृती - गदय विभागातील कृती क्र. ३ व व्याकरण विभाग दोन्ही मध्ये व्याकरण घटकांचा समावेश आहे. गदय विभागातील कृती क्र. ३ मधील व्याकरण हे इ. १ ली ते ९वीच्या अभ्यासक्रमातील व्याकरण घटकांवर समास, संधी व शब्दसंपत्ती यांचा समावेश असेल. सर्वच व्याकरण रचनात्मक नव्हे तर कार्यात्मक पद्धतीने कृतीद्वारा विचारले जाणे अपेक्षित आहे. (पाठांतरावर केवळ माहितीवजा ज्ञानावर आधारित कृती असणार नाहीत.) व्याकरणातील प्रत्येक कृती सूचनेनुसार व आकृती काढून सोडविणे अपेक्षित आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे व्याकरण घटकातील प्रत्येक कृती सोडविताना व्याकरणदृष्ट्या शुद्लेखनाचे पालन होणे अनिवार्य आहे. शुद्धलेखन काटेकोरपणे तपासले जाणेही अपेक्षित आहे.
गदय व स्थूलवाचन विभागातील 'स्वमत’ ही अभिव्यक्ती क्षमतेचे मूल्यमापन करणारी व विदयार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या या बदलातील अधोरेखित अशी अत्यंत महत्वाची कृती आहे. स्वमत लिहिणे म्हणजे आपल्याला वाटते ते काहीही लिहिणे नव्हे हे लक्षात घ्यायलाच हवे.
स्वमतकृती ही ३ प्रकारची असू शकते.
१. उता-याच्या/ पाठ्यांशाच्या आकलनावर आधारित
२. पाठातील मध्यवर्ती विचारावर आधारित
३. पाठातील मध्यवर्ती विचाराबाबत विदयार्थ्यांच्या स्वमत कृतीच्या उत्तरामध्ये निरीक्षण व चिकित्सक विचार यांवर आधारित स्वमत मांडताना
१. पाठातील मध्यवर्ती विचाराचा संदर्भ असणे आवश्यक आहे. २. किंबहुना पाठाच्या मध्यवर्ती कल्पनेवरील/विचारांवरील स्वमत अपेक्षित आहे. ३. हे मत सकारात्मक वा नकारात्मक दोन्ही प्रकारचे असू शकते. दोन्ही ग्राह्य आहेत. ४. उत्तर लिहिताना शब्दमर्यादेच्या निकषांवर गुणदान केले जाणे अपेक्षित आहे. ५. केवळ पाठाच्या आशयावर आधारित उत्तराला पूर्ण गुण मिळणार नाहीत. तर त्यामध्ये विचारावर/ आशयावर केलेल्या स्वतंत्र विचारांची मांडणी व त्यासाठीची प्रगल्भ भाषाशैली यांचा गुणदान करताना विचार केला जाईल. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. स्वमत कृतीचे उत्तर लिहिताना काहीही लिहिले तरी चालते असे नव्हे तर पाठाचा आशय/ लेखकांचे विचार याचा तुम्हाला समजलेला अर्थ (भावार्थ) त्यावर तुम्ही केलेला विचार, अनुभव, निरिक्षण, वाचन चर्चा यावर आधारित तुमचे मत स्वतः च्या शब्दांत प्रभावीपणे मांडणे अपेक्षित आहे.
काव्यसौंदर्यावर आधारित कृती- (पदय) काव्यसौंदर्य म्हणजे कवितेच्या वाच्यार्थापलीकडे जाऊन कवितेतून व्यक्त होणारा भावार्थ समजून, रसास्वाद घेणे. कवितेतील अर्थ सौंदर्य, भावसौंदर्य, विचारसौंदर्य वर्तमान स्थितीशी सांगड घालून त्यावर स्वत:चे मत/विचार मांडणे अपेक्षित आहे.
कृतिपत्रिका तपासताना केवळ वण्र्यविषय समजून वाच्यार्थावर आधारित उत्तराला चांगले गुण मिळणार नाहीत. तर प्रश्नाच्या रोखाने कवितेचा भावार्थ समजून स्वतःला समजलेला अर्थ स्वत:च्या प्रभावी शब्दांत स्पष्ट करणे याचा पूर्ण गुणदानासाठी विचार केला जाईल. प्रभावी भाषाशैलीला गुण देताना प्राधान्याने विचारात घेतले जाईल.
उपयोजित लेखन - कृतिपत्रिकेतील सर्वात महत्वाचा व तब्बल ३० गुणांसाठी असलेला विभाग आहे. अर्थात गुणांपेक्षा अभिव्यक्ती क्षमता हे अधिष्ठान असलेल्या या मूल्यमापन पद्धतीचा तो गाभा आहे. आणि म्हणून महत्वाचा आहे. हे विसरून चालणार नाही.
उपयोजित लेखनातील प्रत्येक घटक हा विदयार्थ्यांना १००% स्वविचार, भावना, कल्पना, निरीक्षण, अनुभव व सृजनशीलता यांवर आधारितच सोडवायचा आहे. कृती अशाच पद्धतीने विचारल्या जातील की ज्यांची तयार उत्तरे तुम्हाला उपलब्ध होणार नाहीत. मुख्य म्हणजे कृती स्वानुभव व निरीक्षणावर आधारित लिहावयाची असल्याने तयार उत्तरे मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उदा. तुम्ही अनुभवलेल्या प्रसंगाचे वर्णन करणे अपेक्षित कृतीत इतरांचा अनुभव कसा उपयुक्त ठरणार. तो स्वविचाराने लिहीणेच आवश्यक आहे व त्याचाच विचार गुणदानासाठी केला जाणार हे निश्चित.
उपयोजित लेखनातील घटकांच्या लेखन व मूल्यमापनाबाबतच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यानुसार विदयार्थ्यांनी सराव करावा.
घटकांनुसार योग्य / उत्तम गुण मिळविण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
पत्रलेखन - १. पत्राचे प्रारूप - मायना, दिनांक, लिफाफ्यासह पत्ता हे तर आवश्यक आहेच शिवाय २.मजकुरातील सर्व मुद्द्यांचा विचार करून पत्र प्रकारानुसार भाषा व ३. विचारांची मांडणी गुणदानासाठी लक्षात घेतली जाईल.
कथालेखन - कथालेखनासाठी- अपूर्ण कथा पूर्ण करा, शेवट दिलेल्या कथेची सुरुवात लिहा. शीर्षकावरून/ कधी बीजावरून कथा लिहा. शब्दांवरून कथालेखन यांपैकी एका प्रकाराने कथालेखन विचारले जाईल.
प्रकार कोणताही असला तरी- १. कथा भूतकाळात असणे २. शीर्षक व तात्पर्य यांबरोबर ३. कथाबीजाचा सुसूत्र मांडणीने विस्तार अपेक्षित आहे. उत्तम गुणांसाठी- ४. हटके/ नावीन्यपूर्ण कल्पना व कथेची भाषा ५. (पात्र, संवाद, भूमिका यांचा सुयोग्य वापर) यांस प्राधान्य देण्यात येईल.
अभिप्रायलेखन, संवादलेखन, जाहिरात लेखन, वृत्तान्त लेखन यासर्वच घटकांसाठी गुणदान करताना अपेक्षित बाबी खालीलप्रमाणे असतील.
१. घटकानुसार लेखनासाठी केवळ विषयानुरूप लेखन पुरेसे नाही.
२. कृतीतील सर्व मुदयांचा मजकूरामध्ये सुयोग्य, अर्थपूर्ण वापर अत्यंत आवश्यक आहे.
३. सकारात्मक वा नकारात्मक अभिप्राय/ मत देण्यास हरकत नाही. फक्त त्याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.
४. भाषाशैली / प्रभावीलेखन यासाठी गुण राखीव असतील
१) संवादलेखनात- १. विषयानुरूप पात्रांची योजना, २. विषय विस्तारास्तव संवाद व ३. विरामचिन्हांचा सुयोग्य वापर अपेक्षित आहे.
२) जाहिरातलेखनासाठी - १. साहित्यवस्तुंच्या वैशिष्ट्यांसह आकर्षक मांडणी व नवीन्यपूर्ण कल्पना
महत्वाची आहे. सृजनशील कल्पकता/ जाहिरातलेखनातील वेगळेपण हा जाहिरात लेखनाचा आत्मा असतो व तोच अधिक गुणांसाठी महत्वाचा आहे.
३) वृत्तान्तलेखनासाठी - १. कृतीतील सर्व मुदयांचा बारकाव्यासह योग्य वापर करून घडलेल्या घटनेची मांडणी करताना लेखनविषय समजून घडलेला वृत्तान्त २. आकर्षक व प्रभावी भाषेत मांडणे. हे गुणदानासाठी विचारात घेतले जाईल.
४) अभिप्रायलेखनसाठी - १. सर्व मुदयांच्या समावेशा-बरोबरच २. विषयाचे सामाजिक महत्त्व, ३. त्यातून मिळणारा संदेश, मूल्य हे मुद्दे आवश्यक आहेत. ४. सर्वात महत्वाचे म्हणजे विषयवस्तू बाबत स्वत: चा अभिप्राय देणे ५. तो प्रभावी भाषेत मांडणे अपेक्षित आहे. ६. स्वत:च्या शब्दांत व स्पष्टीकरणासह मांडणे अपेक्षित आहे.
५) सारांशलेखनासाठी- सारांशलेखन म्हणजे केवळ उतारा संक्षिप्त करणे नव्हे म्हणूनच त्यासाठी उता-यातील वाक्ये उतरवू नयेत. तर उता-यातील आशयाचा मध्यवर्ती
६) भावार्थ लेखनासाठी मात्र याही पलीकडे जाऊन मध्यवर्ती विचारामागील भावार्थ समजून तो आपल्याला कळला तसा थोडासा अधिक स्पष्ट करण्यासाठी स्वतंत्रपणे केलेला विचार स्वतःच्या शब्दात मांडणे अपेक्षित आहे.
निबंध - निबंध लेखन हा तुमच्या परिचयाचा घटक आहे. फक्त तो आता ५ गुणांसाठी आहे हे लक्षात घेऊन विस्तृततेपेक्षा सुयोग्य आशयाने (To The Point) लिहिणे. विषय व प्रकारानुसार प्रभावी भाषाशैलीने तो फुलविणे महत्त्वाचे आहे.
किती लिहिले यापेक्षा कसे लिहिले? काय विचार केला? कशी मांडणी केली? याला प्राधान्य राहील. व सर्व निबंध कृतिरूपात विचारले जातील हे लक्षात घेऊन त्यांचा सराव करावा.
प्रश्नपत्रिकेकडून कृतिपत्रिकेकडे हा प्रवास आपणा सर्वांना माहिती आहे. कृतिपत्रिकेचे स्वरूप आपण अभ्यासले आहे. त्यानुसार कृतिपत्रिका कशी सोडवावी? कशी तपासावी? कशी तपासली जाणे अपेक्षित आहे. या विषयीचा उहापोह आपण केला. मंडळाच्या या सर्व अपेक्षांना आपण सर्व शिक्षक आपल्या विदयार्थ्यांच्या सुयशासह उतरणार आहोतच त्यासाठी आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा! आणि विद्यार्थ्यांसाठी- यशवंत व्हा! गुणवंत व्हा!
लेखिका : डॉ. स्नेहा जोशी, पुणे
स्त्रोत : शिक्षण संक्रमण जानेवारी २०१७
अंतिम सुधारित : 7/26/2023
संपूर्ण कृतिपत्रिकेमध्ये गदय, पदय, स्थूलवाचन, व्या...