आपल्या आवडत्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन त्यातच करिअर करून यशस्वी व्हायचं प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं. पण अनेकदा आर्थिक अडचणींमुळे तसंच योग्य माहिती अभावी विद्यार्थ्यांना आपलं स्वप्न पूर्ण करणं शक्य नसतं. अशा गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी सरकारी तसंच सामाजिक संस्थांच्या अनेक शिष्यवृत्ती योजना उपलब्ध असतात. अशा विविध शिष्यवृत्ती योजनांबद्दल…
ही शिष्यवृत्ती १० वी आणि १२ वीचं शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याला देण्यात येते. या शिष्यवृत्तीकरता पात्रता परीक्षा ठेवण्यात आली आहे. यासाठी अर्ज करायचा असेल तर ३१ डिसेंबर पूर्वी भरावा. परीक्षा नागपूर, पुणे, मुंबई इथे होणार आहे. परीक्षा पास होणार्या विद्यार्थ्यांना २५ ते ५० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
वेबसाईट : http://nest.net.in/nest.htm
या शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थी १२ वी पास ते पदवीधर असावा. वार्षिक ८०,०००/- रुपये या शिष्यवृत्तीमध्ये मिळतात.
वेबसाईट : http://www.inspire-dst.gov.in/SHE.html
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मिळणार्या या शिष्यवृत्तीकरता १० वीपासून पदवीपर्यंतचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. १० वी आणि आय.टी.आय.च्या २००० विद्यार्थ्यांना दोन वर्षांकरता रुपये १००० महिना दिले जातात तर इंजिनिअरिंगच्या ३०० विद्यार्थ्यांना चार वर्षांकरता ३,०००/- रु. महिना दिले जातात. तसंच एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांना चार वर्षांकरता ३००० रुपये महिना आणि एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांकरता ६५ टक्के, एस्.सी.-एस्.टी., ओबीसी आणि मुलींकरता ६० टक्के तर अपंग मुलांना ५० टक्के अट असून गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या शिष्यवृत्तीकरता परीक्षा किंवा मुलाखत नाही.
वेबसाईट : http://www.iocl.com/aboutus/scholarships.aspx
ही योजना भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे राबवली जाते. कर्तृत्ववान आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांना विज्ञान आणि संशोधन याकडे आकर्षित करण्याकरता शिष्यवृत्ती देण्यात येते. विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही दिली जाते. या योजनेअंतर्गत अकरावी विज्ञानशाखेत प्रवेश घेतलेल्या आणि दहावीला विज्ञान आणि गणित विषयात किमान ८० टक्के गुण प्राप्त आहेत अशा विद्यार्थ्यांची निवड होऊन एक वर्ष तज्ज्ञांचं मार्गदर्शन दिलं जातं. विविध कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना आमंत्रित केलं जातं. बारावीला किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. तसंच मूलभूत विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रमामध्ये पहिल्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी यासाठी पात्र असतात. १२ वी विज्ञानशाखेत तसंच पदवीच्या पहिल्या वर्षामध्ये किमान ६० टक्के आवश्यक आहेत. दरमहा ५०००/- रुपये फेलोशिप मिळते आणि इतर खर्चाकरता वार्षिक रु. २०,०००/- रु. अनुदान दिलं जातं. तसंच या योजनेद्वारे एक किंवा दोन आठवड्यांच्या समर कॅम्पचंही आयोजन केलं जातं. यामध्ये संशोधन क्षेत्रातील वातावरण, कृतिशील विज्ञान, संशोधकांना प्रत्यक्ष काम करताना पाहणं, शास्त्रज्ञांशी चर्चा करणं, भेटी देणं तसंच राष्ट्रीय प्रयोगशाळांना, विद्यापीठांतील प्रयोगशाळा आणि लायब्ररीचा उपयोग करून घेता येतो. या सर्व संधी मिळवण्याकरता पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य असतं.
वेबसाईट : http://www.kvpy.org.in/main/
ही योजना जमशेदजी टाटा यांच्या निधीतून दिली जाते. ही शिष्यवृत्ती पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएच्.डी.च्या भारतीय विद्यार्थ्यांना दिली जाते. १,५०,०००/- आणि ८,००,०००/- रु. शिष्यवृत्ती दिली जाते या शिष्यवृत्तीकरता डिसेंबर ते जानेवारी दरम्यान अर्ज भरावा. मार्च ते जूनमध्ये मुलाखत होऊन शिष्यवृत्ती वाटण्यात येते. सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी ९२७३६६३०३२ या हेल्पलाईनवर संपर्क साधवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा अर्ज भरून आपलं उच्च शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करावं.
वेबसाईट : http://www.dorabjitatatrust.org
ही शिष्यवृत्ती भारतीय जीवन विमान निगमकडून दिली जाते. बारावीत ६० टक्के गुण मिळवलेल्या गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना महिन्याला एक हजार रुपये म्हणजेच १० महिन्याकरता १०,०००/- रु. दिले जातात. या शिष्यवृत्तीच्या माहितीअभावी विद्यार्थी या लाभापासून वंचित आहेत.
http://www.licindia.in/GJF_scholarship.htm
ही शिष्यवृत्ती फुलब्राइट कार्यक्रमांतर्गत अमेरिका आणि इतर देशांमधील परस्पर सामंजस्यांचा भाग म्हणून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणार्या हुशार विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना दिली जाते. त्यामध्ये विदेश प्रवास खर्च, शैक्षणिक खर्च, राहण्याचा खर्च आदींचा समावेश असतो. या शिष्यवृत्तीकरता महाविद्यालय, विद्यापीठ शाखा, संशोधक, माध्यमिक शाळा, शिक्षक, धोरणकर्ते, प्रशासक आणि व्यावसायिक इत्यादी व्यक्ती सहभागी होऊ शकतात. या शिष्यवृत्तीकरता अर्ज भरावेत.
http://www.usief.org.in/Fellowships/Fulbright-Nehru-Fellowships.aspx
राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विकास मंत्रालयाकडून मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, जैन इत्यादी अल्पसंख्याकांसाठी तांत्रिक आणि व्यावसायिक बारावीनंतर सर्व कला, वाणिज्य, विज्ञान, पदवी, पदव्युत्तर शिक्षण, पदविका, बी.टेक्., एम.ई., एम. टेक्. इत्यादी सर्व शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीकरता अर्ज करावेत.
http://www.dtemaharashtra.gov.in/scholarships/
सिंगापूरद्वारे फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी आशियन स्कॉलरशिप, एस.आय.ए. युथ स्कॉलरशिप, ए-स्टार इंडिया स्कॉलरशिप, एम.ओ.ई, स्कॉलरशिप फॉर सेकंडरी आणि प्री, युनिव्हर्सिटी स्टडीज्, हाँगकाँग स्कॉलरशिप आणि अॅवॉर्डस अशा शिक्षणाला प्रोत्साहन देणार्या योजना आहेत. ए-स्टार इंडिया युथ स्कॉलरशिपकरता विद्यार्थ्यांना ७ वी आणि ८ वीमध्ये इंग्रजीमध्ये ८० टक्के गुण असणं आवश्यक आहे. २२०० डॉलर (सेकंडरी) तसंच २४०० सिंगापूर डॉलर (प्री युनिव्हर्सिटी) दिले जातात. या स्कॉलरशिपकरता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत.
या शिष्यवृत्तीकरता १० वीत ६० टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्यास पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च दिला जातो. म्हणून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त मुलींनी घ्यावा.
मौलाना आझाद इंटरनॅशनल स्कॉलरशिप ः ही शिष्यवृत्ती मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशन, अल्पसंख्याक मंत्रालय, भारत सरकारद्वारे देण्यात येते. यासाठी ११ वीला प्रवेश घेतलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाचा संपूर्ण खर्च, (पुस्तकं, स्टेशनरी, राहणं आणि जेवणाचा संपूर्ण खर्च) या योजनेंतर्गत देण्यात येतो.
http://www.udayancare.org/Udayan-Shalini-Fellowship-Programme.html
ही शिष्यवृत्ती काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रीअल रिसर्च नई दिल्ली यांच्याकडून दिली जाते. १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे सर्व विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरता अर्ज करू शकतात. प्रथम पुरस्कार एक लाख रुपये, द्वितीय पन्नास हजार, तृतीय तीस हजार, चतुर्थ वीस हजार रुपये, पाचवा पुरस्कार दहा हजार रुपये असे दिले जातात. या शिष्यवृत्तीकरता अर्ज करावेत आणि आपल्या पुढील शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करावं.
ही शिष्यवृत्ती द टाईम्स ऑफ इंडियाकडून दिली जाते. १२ वी मधील विद्यार्थ्यांना आपल्या उच्च शिक्षणासाठी (पदवीच्या चार वर्षांकरता) ५०,०००/- रुपये मदत केली जाते.
http://timesofindia.indiatimes.com/timesscholar.cms
ही शिष्यवृत्ती जवाहरलाल नेहरू मेमोरिअल फंडकडून दिली जाते. पीएच्.डी. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना १२,०००/- रु. महिना देण्यात येतात आणि शैक्षणिक साहित्य आणि सहलीकरता १५,०००/- रु. वर्षाला दिले जातात.
http://www.jnmf.in/sabout.html
या योजनेंतर्गत ५ वी ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो. गुणवत्तेनुसार १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी २००० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
चंद्रशेखर पोस्ट डॉक्टरल फेलोशिप
ही योजना इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स, बंगलूरूद्वारे देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी एस्ट्रोनॉमी आणि एस्ट्रोफिजिक्समध्ये रिसर्च करणारे विद्यार्थी आवश्यक आहेत. महिन्याला २५,०००/- रु. स्टायपेंड तर वर्षाला १ लाख रुपये देण्यात येतात.
नासा स्पेस सेटलमेंट कॉन्टेस्ट योजना
ही शिष्यवृत्ती नासा आणि नॅशनल स्पेस सोसायटीद्वारे देण्यात येते. या शिष्यवृत्तीकरता इयत्ता ६ वी ते १२ वी, इयत्ता २ री ते ६ वी आणि १२ वीपर्यंतच्या सर्व मुलामुलांना या स्पर्धेत सहभागी होता येतं. सविस्तर माहिती घरपोच पाठवली जाते.
इंटर्नशाळा करिअर स्कॉलरशिप फॉर गर्ल्स (फक्त मुलींसाठी)
ही शिष्यवृत्ती १७ ते २३ या वयोगटातील मुलींसाठी आहे. यासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान अर्ज भरावा. या शिष्यवृत्तीमध्ये २५,०००/- रु. दिले जातात.
नॅशनल स्टॅण्डर्ड एक्झॅमिनेशन (नॅशनल ऑलिम्पिआड)
या योजनेअंतर्गत होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फण्डामेंटल रिसर्च यांच्याकडून टॉप १२ विद्यार्थ्यांना रोख आणि पुस्तकाच्या स्वरूपात ५००० रु. दिले जातात. या शिष्यवृत्तीकरता इयत्ता ७ वी ते १० वीचे विद्यार्थी पात्र आहेत.
समर रिसर्च फेलोशिप योजना
ही शिष्यवृत्ती जवाहरलाल नेहरू रिसर्च सेंटर, बंगलुरूकडून देण्यात येते. १० वी, १२ वी, बी.एस्सी., बी. व्ही. एस्सी, बी.ई., बी.टेक्., एम्.एस्सी. सर्वांना दोन महिन्यांचा स्टायपेंड ६००० रुपये प्रति महिना देण्यात येतो.
इन्स्टिट्यूट ऑफ रुरल रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट फेलोशिप
शिक्षणाचा पूर्ण खर्च दिला जातो.
एम.जे. मॅथ्स् स्कॉलरशिप परीक्षा (मॅथ्स स्कॉलरशिप)
मॅथ्स् परीक्षेकरता इयत्ता ५ वी ते १० वीचे विद्यार्थी बसू शकतात.
प्राईम मिनीस्टार फेलोशिप योजनाः
ही योजना डॉक्टरेट रिसर्च करणार्या १०० विद्यार्थ्यांना मिळते.
इतर काही स्कॉलरशिप योजना
प्रो. आर.पी. आनंद मेमोरिअल इंटरनॅशनल लॉ स्कॉलरशिप योजना, भारत पेट्रोलियम स्कॉलरशिप फॉर हायर स्टडीज्, फेअर अॅन्ड लव्हली फाऊंडेशनद्वारे (सरस्वती स्कॉलरशिप), सिव्हिल अॅव्हिएशन स्कॉलरशिप, एच.एस.बी.सी. स्कॉलरशिप, नॅशनल टॅलेन्ट स्कॉलरशिप इन अॅग्रिकल्चर महिंद्रा स्कॉलरशिप, यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप.
उच्च शिक्षण मिळाल्यास उच्चप्रतीची नोकरी मिळते. एक विद्यार्थी एकापेक्षा जास्त स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतो. हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. फक्त माहितीअभावी विद्यार्थी या योजनांपासून वंचित आहेत. अधिक माहितीकरता विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका, फोटो आणि बायोडेटा पाटील करिअर अॅकॅडमी, इंडियन स्कॉलर स्कूल, न्यायालयाची जुनी इमारत, कॉटर मार्केट समोर, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती इथे पाठवावेत. या अॅकॅडमीतर्फे मोफत स्कॉलरशिप सेमिनारही घेण्यात येतो. यामध्ये १०० पेक्षा जास्त स्कॉलरशिप्सबद्दल मोफत मार्गदर्शन करण्यात येतं. तसंच मोफत मार्गदर्शनाकरता स्कॉलरशिप हेल्पलाईन ९२७३६६३०३२/९१७५५१८०७४ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
लेखक : डॉ. नंदकिशोर पाटील
स्त्रोत : कलमनामा
माहिती संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 4/25/2020
महाराष्ट्र राज्यामधून एकूण बारावी उत्तीर्ण होणाऱ्य...
स्वीडिश गणितज्ञ. गणितीय
महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाआयटी) ने वि...
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यातील अनुसूचित ...