बरोबर – आपली पृथ्वी स्वत:भोवती फिरते. ज्या अक्षाभोवती ती फिरते त्याची दोन टोके म्हणजे दोन ध्रुव. एक उत्तरेकडे आहे तर एक दक्षिणेकडे. याच ध्रुवीय प्रदेशांमध्ये कधी कधी रात्री आभाळात रंगीबेरंगी उजेड पडलेला दिसतो. त्यालाच ध्रुवीय उषा म्हणतात. या उजेडाला लॅटीन भाषेत “ऑरोरा” म्हणतात. “ऑरोरा” म्हणजे सूर्योदय.
ध्रुवबिंदूच्या 10 ते 20 अंशापर्यंतच्या गोलाकार भागात हा उजेड दिसू शकतो. आपली पृथ्वी म्हणजे एक मोठे चुंबकही आहे, त्यामुळे तिला दोन चुंबकीय ध्रुवही आहेत. भौगोलिक ध्रुवांपेक्षा त्यांची जागा जरा वेगळी आहे. (82.7० उत्तर 114.4० पश्चिम (2005). त्यांची जागा दरवर्षी सुमारे 40 किलोमीटर इतकी बदलते.).
सूर्यावरून प्रकाशाप्रमाणेच सतत प्रारणे बाहेर फेकली जात असतात. या प्रारणांमध्ये अनेकदा विद्युतभारीत सूक्ष्म कण असतात. धृवीय प्रदेशातील विशिष्ट चुंबकीय क्षेत्रामुळे हे सूक्ष्म कण हवेच्या वरच्या स्तरातील विरळ वायूंना धडकतात. त्या धडकांमुळे हा प्रकाश निर्माण होतो. तो पिवळसर हिरवा, नारींगी इ. रंगछटात पहायला मिळतो.
अंतिम सुधारित : 10/7/2020
आपल्या सौरमंडळातील सूर्याच्या निर्मितीच्याही आधीपा...
भूरसायन शास्रात पृथ्वी व तिचे घटक यांचा रसायनशास्...
सूर्य मालिकेतील तिसरा ग्रह म्हणजे आपली पृथ्वी.
पृथ्वीच्या कवचाची आणि विशेषकरून पृथ्वीच्या खोल अंत...