कॉमिनफॉर्म : रशियाच्या नेतृत्वाखाली १९४७ मध्ये विल्चा गोरा (पोलंड) येथे स्थापन झालेली कम्युनिस्ट पक्षांची संघटना. या संघटनेत रशिया, पूर्व युरोपातील रशियाची अंकित राष्ट्रे, फ्रान्स व इटली या देशांतील कम्युनिस्ट पक्ष सामील झाले होते. एका अर्थाने ही संघटना कॉमिन्टर्नचाच वारसा घेऊन जन्माला आली होती. परंतु तिचे क्षेत्र व शक्ती कॉमिन्टर्नपेक्षा फारच कमी होती दुसऱ्या महायुद्धानंतर यूरोपमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीत रशियाच्या प्रभावाचे क्षेत्र वाढविणे, हा एक महत्त्वाचा उद्देश या संघटनेमागे होता. म्हणूनच ही संघटना म्हणजे रशियाचे अधिकृत आंतरराष्ट्रीय नियंत्रण केंद्र मानली जात होती. या संघटनेच्या साहाय्यानेच रशियाने चेकोस्लाव्हाकिया, पोलंड, हंगेरी आणि इतर पूर्व युरोपीय देशांत अल्पसंख्य कम्युनिस्ट पक्षांना सत्तेवर बसविले व पूर्व युरोप हा आपल्याच सोव्हिएट राज्यपद्धतीचा भाग आहे असे प्रतिपादन केले.
पण यूगोस्लाव्हियातील कम्युनिस्ट पक्षाला रशियाचा हस्तक्षेप जाचक वाटला व तो देश कॉमिनफॉर्ममधून जून १९४८ मध्ये बाहेर पडला. स्टालिनच्या मृत्यूनंतर ख्रुश्चेव्हने १९५६ साली ही संघटना विसर्जित केली.
लेखक - स. मा. गर्गे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 2/12/2020
चिनी कम्युनिस्टांच्या क्रांतियुद्धातून पुढे आलेला ...
पोलिश क्रांतिकारक आणि जर्मनीतील कम्युनिस्ट पक्षाची...
एक वंश, एक भाषा, एक धर्म अगर सामाजिक वा सांस्कृति...
मार्क्स आणि एंगेल्स यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार ...