खनिज, स्फटिक एकनताक्ष, आखूड, प्रचिनाकार. बहुधा यमल (जुळे) स्फटिक आढळतात. पुष्कळदा (001) व कधीकधी (100) या पृष्ठांवर यमलन झालेले असते. कधीकधी कणमय व क्वचित पत्रित (पापुद्रे असलले) पुंज आढळतात. पाटन : (110) स्पष्ट. पाटनपृष्ठांमधील कोन जवळजवळ ९०० असतो. कधीकधी (100) व (001) पृष्ठांना समांतर अशी चांगली विभाजनतले असतात [→ पाटन; स्फटिकविज्ञान]. ठिसूळ कठिनता ५-६ वि. गु. ३·२ -३·४ दुधी काचेसारखे पारभासी. चमक काचेसारखी. रंग गडद हिरवा ते काळा. कस पांढरा, करडा. रा. सं. Ca(Mg, Fe, Al) (Al, Si)2O6. पायरोक्सीन गटातील सर्वांत सामान्य खनिज असून ते गॅब्रो, डोलेराइट, बेसाल्ट इ. अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण अल्प असलेल्या) अग्निज खडकांत एक घटक खनिज म्हणून आढळते. याची पाटनपृष्ठे चमकदार असतात. म्हणून चमक अर्थाच्या ग्रीक शब्दावरून ऑजाइट हे नाव दिले गेले.
अंतिम सुधारित : 9/1/2020
खनिज, स्फटिक चतुष्कोणीय सामान्यत: प्रचिनाकार, कधीक...
लोकसंख्या विस्फोट, प्रदूषण, जंगलतोड, पर्यावरणाची न...
उद्गम शैलातून बाहेर घालविलेले तेल त्याला वाट मिळत...
खनिज. स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार, वडीसारखे; सामान...