अ) त्वान्त
आ) ल्यबन्त
एक विधान पूर्ण करणारा शब्दसमूह म्हणजे वाक्य. विधान पूर्ण होण्यासाठी एक तरी क्रियावाचक शब्द लागतो. परंतु कधी कधी एकाच वाक्यात अनेक क्रिया सांगितलेल्या असतात. अशावेळी एखादी क्रिया मुख्य असते व इतर क्रिया तिच्या मानाने दुय्यम असतात. फक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी या सर्व क्रियांचा कर्ता एकच असतो. अगोदर घडलेल्या क्रिया दाखविण्यासाठी जे क्रियावाचक शब्द (धातुसाधित) वापरले जातात त्यांना पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय म्हणतात. वेगवेगळे कर्ते असतील तर अशा पूर्वकालवाचके वापरत नाहीत.
ही अव्यये धातूंना `त्वा' किंवा `य' प्रत्यय जोडून केलेली असतात. धातू उपसर्गरहित किंवा उपपदरहित असेल तेव्हा `त्वा' हा प्रत्यय लावला जातो. उपसर्ग किंवा उपपदयुक्त धातू असेल तर `य' म्हणजे (ल्यप्) हा प्रत्यय लावला जातो. `त्वा' प्रत्यय जोडलेल्या धातूरूपाला `त्वान्त' म्हणतात. तर `य' प्रत्यय जोडलेल्या धातूरूपाला `ल्यबन्त' म्हणतात.
`त्वा' व `य' हे प्रत्यय जोडताना काही धातूत बदल होतात. काहीवेळी त्यापूर्वी `इ' आगम होतो. `त्वा' प्रत्यय जोडताना दहाव्या गणातील धातूंना विकरण जोडावे लागते. `य' प्रत्यय जोडताना गुण, वृद्धि इ. बदल होतात. `य' प्रत्यय लावताना विकरण लावले जात नाहीत.
उदा. चिन्तयित्वा, विचिन्त्य
बालक: गृहं गच्छति । अनन्तरं बालक: भोजनं करोति ।
याऐवजी बालक: गृहं गत्वा भोजनं करोति ।
येथे बालक : हा दोन्ही वाक्यात एकच कर्ता असल्याने दोन्ही वाक्यांऐवजी गत्वा हे त्वान्त अव्यय वापरून हा खालीलप्रमाणे एकच वाक्य केले जाते.
बालक: गृहं गच्छति । अनन्तरं माता तं भोजनं यच्छति ।
या वाक्यांमधील कर्ते वेगवेगळे असल्याने गत्वा असे पूर्वकालवाचक वापरले जात नाही.
स्था - स्थित्वा , पा - पीत्वा , वच् - उक्त्वा , मुच् - मुक्त्वा
आ + नी - आनीय , उद् + क्षिप् - उत्क्षिप्य ,
प्र + विश् - प्रविश्य , आ + गम् - आगत्य
स्त्रोत - संस्कृतदीपिका
अंतिम सुधारित : 8/15/2020
हेत्वर्थक अव्यये - (यालाच `तुमन्त' अव्यये असेही म्...